शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

Coronavirus: घरी परतणाऱ्या मजुरांच्या प्रवासाचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 9:28 AM

कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मजूर आणि कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचे जाहीर केले. 

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून देशभरात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात नेण्यासाठी रेल्वे भाडं आकारणार आहे. तोच मुद्दा आता सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील संघर्षाचे नवे कारण बनला आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मजूर आणि कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचे जाहीर केले. 

नवी दिल्लीः कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून देशभरात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात नेण्यासाठी रेल्वे भाडं आकारणार आहे. तोच मुद्दा आता सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील संघर्षाचे नवे कारण बनला आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मजूर आणि कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचे जाहीर केले. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. शुक्रवारी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सरकारने विशेष गाड्या सोडण्यास सुरुवात केली. रेल्वे परिपत्रकानुसार स्थानिक सरकारी अधिकारी सर्व पडताळणी करून मजुरांना तिकिटे देतील आणि त्यांच्याकडून तिकीट भाडे आकारले जाईल. मजूर आणि कामगारांकडून आकारण्यात येणारी तिकिटाच्या स्वरूपातील एकूण रक्कम ते अधिकारी रेल्वेला देणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोदी सरकारवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.  काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं असून, त्यांनी ते ट्विट केले आहे. 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने निर्णय घेतला आहे की, राज्य कॉंग्रेस कमिटीच्या प्रत्येक विभागानं गरजू मजूर व कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा प्रवास खर्च उचलावा. त्यांच्या तिकिटांचा खर्च करण्यासंदर्भात आवश्यक ती पावले उचलावीत. खरं तर राज्यांवर मजुरांच्या तिकिटाचा खर्च टाकून आणि त्यांच्याकडून भाडे वसूल केल्यानं विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळेच या स्थलांतरित कामगारांच्या प्रवासाचा खर्च केंद्राने उचलावा, अशी मागणी भाजपा विनाशासित राज्यांची आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IFSC: खायचे महाराष्ट्राचे व गोडवे गायचे महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांचे; शिवसेनेकडून फडणवीसांचा समाचार

Coronavirus: कोरोना लसीच्या आम्ही एकदम जवळ; डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली 'वेळ'

होय, ते परत येताहेत; पण तिरंग्यात लपेटून; शहीद कर्नल शर्मा यांच्या पत्नीची आर्त भावना

... तर लॉकडाऊनचे नियम मोडून आम्ही रस्त्यावर उतर, खासदार जलील यांचा इशारा

एन्काऊंटरवेळी कर्नलच्या फोनवर दहशतवाद्यांनी म्हटलं अस्सलाम वालेकुम; अन्...

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या