नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंतेचं वातावरण बनलं आहे. अशा परिस्थितीत अनेक व्हिडीओ समोर येत आहेत ज्यात कुठे रुग्णांना बेड मिळत नाही, कुठे मृतदेह पडून आहेत. राजधानी दिल्लीतही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोना दहशतीचा स्वत: आलेल्या अनुभवाने पत्रकाराच्या कुटुंबावर अक्षरश: डोंगर कोसळला आहे.
कोरोनामुळे घरात गेल्या १० दिवसांत दोघांचा मृत्यू झाला आहे. इतकचं नाही तर घरातील लहान मुलांसह कुटुंबातील सर्वच सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. पत्रकार अजय झा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील हा भयानक अनुभव शेअर केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.
याबाबत राहुल गांधी यांनी लिहिलं आहे की, अजयसारख्या लाखो बहिण-भावांचे दु:ख आम्ही जाणतो, आम्ही तुमच्या रक्षणासाठी सर्वकाही करु, आपण एकत्र मिळून या संकटाचा सामना करु असा धीर राहुल गांधी यांनी दिला आहे. अजय झा आणि त्यांची पत्नी दोघंही एका माध्यमात काम करतात. व्हिडीओच्या माध्यमातून अजय झाने सांगितले की, माझी पत्नी आणि दोन मुलांसह घरातील इतर सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह आहेत, गेल्या १० दिवसात घरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्यांदा माझे सासरे आणि त्यानंतर सासू यांनी कोरोनामुळे अखेरचा श्वास घेतला असं ते म्हणाले.
त्याचसोबत या दोघांचे मृतदेह खूप वेळ घरातच ठेवले होते, कोणीही त्यांना नेलं नाही. प्रत्येक जण एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करत होते. केजरीवाल आणि इतर सरकार दावा करत आहे की, सर्व सुविधा दिल्या आहेत पण असं काहीच नाही हे सत्य आहे. रामभरोसे लोकांचे जीवन आहे. मी आणि माझं कुटुंब अडचणीत आहे. लोकांनी आम्हाला मदत करा आम्हाला यातून बाहेर काढा. माझ्या दोन छोट्या मुली आहेत. यापुढे काही होईल मला सांगता येत नाही. मदत हवी, उपचार हवी, लोकांनी पुढे येऊन मदत करावी अशी विनवणी पत्रकार व्हिडीओत करताना दिसत आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
“कोकणातील जनता ही आपली मालमत्ता असल्यासारखं शिवसेना वागतेय”
अरविंद सावंत यांनी घेतला राजनाथ सिंह यांचा समाचार; ही बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे पण...
मुख्यमंत्री नेमकं केस-दाढी कुठं करतात? भाजपा आमदाराचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
भारताबाबत खरा ठरतोय ‘या’ वैज्ञानिकाचा दावा; जुलैपर्यंत २१ लाख कोरोना रुग्ण होणार?
...म्हणून भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईला दिल्लीच्या रुग्णालयात केलं दाखल