नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. तेसेच त्यांच्या आईचा कोरोना रिपोर्टदेखील पॉझिटिव्ह आला आहेत. थरूर यांची आई 85 वर्षांची आहे. महत्वाचे म्हणजे या दोघांनीही कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. (Congress leader shashi tharoor tests positive for coronavirus)
यासंदर्भात थरूर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की टेस्टिंग अपॉइंटमेन्टसाठी दिलेले दोन दिवस आणि रिपोर्टसाठी दीड दिवस वाट पाहिल्यानंतर पुष्टी झाली, की मी कोविड पॉझिटिव आहे. माझी बहीण आणि 85 वर्षांच्या माझ्या आईचा रिपोर्टदेखील पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?
थरूर यांनी म्हटले आहे, "आपल्याला माहित असायला हवे, की माझ्या बहिणीने कॅलिफोर्निया येथे फायझरचे दोन्ही डोस घेतले आहेत. मी आणि माझ्या आईने कोविशिल्ड लशीचा दुसरा डोस आठ एप्रिलला घेतला होता. यामुळे आमच्याकडे असे म्हणण्याचे पुरेसे तर्क आहेत, की कोरोना लस कोरोनाचे संक्रमण रोखत नाही, तर लस व्हायरसचा प्रभाव कमी करते.
केरळमध्ये कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. केरळात बुधवारी 22,414 लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 5,000 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.