नवी दिल्ली: देशातील कोरोनाची परिस्थिती हळूहळू आणखीनच गंभीर होताना पाहायला मिळत आहे. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स या सर्वांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. रुग्णांना उपचार घेण्यात अडचणी निर्माण होताना पाहायला मिळत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. यंत्रणा कोलमडली आहे. आता 'जन की बात' करा, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (rahul gandhi criticised pm narendra modi on mann ki baat)
अलीकडेच राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ते गृह विलगीकरणात आहेत. राहुल गांधी सातत्याने देशातील परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांशी मन की बात कार्यक्रमातून संवाद साधला. यावरून आता राहुल गांधी यांनी टीका केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदासाठी उतावीळ, म्हणून चुकीची पावलं टाकतायत: माजी IPS अधिकारी
काय म्हणतात राहुल गांधी?
यंत्रणा कोलमडून गेल्या आहेत. आता तरी जन की बात करा. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सर्व राजकीय कामे बाजूला ठेवावीत आणि जनतेला मदत करावी. कोणत्याही परिस्थितीत देशातील जनतेची दु:ख दूर करा. हाच काँग्रेसचा धर्म आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोरोनाच्या गंभीर संकटाचा देशविरोधी शक्तींकडून फायदा घेण्याचा प्रयत्न: RSS
केंद्राच्या अपयशामुळे कोरोनाची दुसरी लाट
केंद्र सरकारच्या अपयशामुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यापूर्वी केला. स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसमान्यांचे जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणे आवश्यक आहे. मात्र, अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अॅलर्जी आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला होता.
“पंतप्रधान मोदींनी स्वतःमध्ये उद्धव ठाकरेंसारखे बदल केले पाहिजेत”
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या करोनाबाधितांची भर पडली असून, तब्बल २७६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत भारतात झालेल्या मृतांची संख्या १ लाख ९२ हजार ३११ इतकी झाली आहे. देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून, देशात करोनाचे एकूण २६ लाख ८१ हजार ७५१ रुग्ण उपचाराधीन आहेत.