नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (coronavirus congress rahul gandhi slams modi govt over receiving foreign help)
गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारची धोरणे, देशातील कोरोना परिस्थिती, कोरोना लसीकरण यांवरून निशाणा साधत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे देशात लॉकडाऊन करण्याची मागणी यापूर्वी राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे परदेशातून आलेल्या विविध मदतीची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. यातच आता राहुल गांधी यांनी केंद्रावर योग्य पद्धतीने काम करत नसल्याचा आरोप केला आहे.
सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागतेय, मग मोदी सरकार काय करतंय?”
ही बाब निराशाजनक
परदेशातून मिळणाऱ्या मदतीवरून केंद्र सरकारने सतत स्वतःची छाती बडवणे हे निराशाजनक आहे. जर मोदी सरकारने आपले काम केले असते तर ही परिस्थिती आली नसती, अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केली आहे.
देशाला PM आवास नको, श्वास पाहिजे
देशाला PM आवास नको, श्वास पाहिजे, असे ट्विट राहुल गांधींनी केले होते. ट्विटमध्ये त्यांची तुलना करणारे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यात एका बाजूला सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे सुरू असलेले काम आणि दुसऱ्या बाजूला कोरोना झालेले रुग्ण श्वासासाठी लढताना दाखवण्यात आले आहेत.
कोरोना नियंत्रणासाठी चीनने केलं, तेच आता भारतानेही करावं; डॉ. अँथनी फाउची
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी दिवसभरात ३ लाख ६६ हजार १६१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ५३ हजार ८१८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ३ हजार ७५४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात ३७ लाख ४५ हजार २३७ रुग्ण उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत १७ कोटी ०१ लाख ७६ हजार ६०३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.