नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी ‘लॉकडाऊन’सह सरकार योजत असलेल्या सर्व उपायांना काँग्रेस पक्षाकडून संपूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल, अशी ग्वाही काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या पत्रात दिली.सोनिया गांधी पत्रात म्हणतात की, या साथीने लागण होणाऱ्यांचे जीव धोक्यात येण्याखेरीज गरीब व वंचित वर्गातील लाखो कुटुंबाचे जगणेही संकटात आले आहे. अशा वेळी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून संपूर्ण देशाने एकजुटीने उभे राहण्याची व प्रत्येक नागरिकाने देशाप्रती व माणुसकीप्रती असलेले कर्तव्य निष्ठेने बजावण्याची नितांत गरज आहे. २१ दिवसांचे ‘लॉकडाऊन’ हे स्वागतार्ह पाऊल,असल्याचे त्यांनी म्हटले.या साथीच्या निमित्ताने देशापुढे सार्वजनिक आरोग्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे व त्यासाठी सर्व व्यवहार ठप्प करावे लागल्याने देशातील फार मोठ्या समाजवर्गासाठी दैनंदिन जीवन जगणे हेही एक फार मोठे आव्हान ठरत आहे.हे सर्व उपाय योजणे अपरिहार्य आहेत तरी त्यामुळे निर्माण झालेल्या या दुर्बल वर्गांच्या हालअपेष्टा कमी करण्यासाठीही सरकारने पावले उचलायला हवेत, असेही त्यांनी सुचविले.खास करून कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स व आरोग्य सेवांमधील अन्य कर्मचाऱ्यांना लागण होण्याचा मोठा धोका असल्याने अशा प्रत्येकाला एन-९५ मास्क व हजमत पोशाखासह व्यक्तिगत सुरक्षेची सर्व साधने पुरविण्यास प्राधान्य दिले जावे व गरज पडल्यास या वस्तूंचे उत्पादन वाढविण्याचे तातडीने उपाय योजले जावेत, अशीही सोनिया गांधी यांनी मागणी केली.प्लेसमेंटचे नियोजन कोलमडलेकोरोनामुळे संपूर्ण जगात आरोग्य संकट निर्माण झाले आहे. त्याचा फटका विद्यापीठांमधील प्लेसमेंट सेललाही बसला असून कंपन्यांनी माघार घेतल्याने विद्यार्थी संकटात सापडले आहेत. तसेच, अनेक विद्यापीठांमधील प्लेसमेंटचे नियोजनही कोलमडले आहे.काँग्रेसने काय केल्या आहेत सूचना- कोरोनाशी संबंधित काम करणाºया आरोग्य सेवांमधील सर्व कर्मचाºयांना १ मार्चपासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने पुढील सहा महिने ‘विशेष जोखीम भत्ता’ दिला जावा.- शेतकरी आणि नोकरदार वर्गाचे कर्जाचे हप्ते सहा महिन्यांपर्यंत स्थगित केले जावेत.- कंपन्या व छोट्या उद्योगांनी या काळात कामावरून कमी केलेल्या रोजंदार व हंगामी कामगारांना त्यांच्या बँकेत काही ठराविक रक्कम दरमहा जमा करण्यासह अन्य प्रकारे साह्य करण्याची योजना जाहीर करावी.
CoronaVirus : सरकारच्या लॉकडाऊनचे काँग्रेसकडून समर्थन; सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 1:37 AM