शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

coronavirus: चिंताजनक! महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये वाढताहेत कोरोनाचे रुग्ण, दुसऱ्या लाटेची भीती

By बाळकृष्ण परब | Published: February 21, 2021 8:20 AM

Corona patients are rise in Maharashtra : गेल्या काही महिन्यांपासून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असताना आता आठवडाभरापासून कोरोनच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होऊ लागली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक, गुजरातमध्येही वाढू लागलीय रुग्णसंख्या शनिवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या सहा हजार २८१ रुग्णांची नोंद, केरळमध्ये चार हजार ६५० रुग्णांची नोंदकोरोनाचा फैलाव पुन्हा वाढू लागल्याने व्यक्त करण्यात येत आहे कोरोनाची दुरसी लाट आल्याची भीती

नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असताना आता आठवडाभरापासून कोरोनच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होऊ लागली आहे. (Covid-19) त्यामुळे विविध राज्यांसह केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. (fearing a Covid-19 second wave) त्यातही महाराष्ट्रासह, केरळ, गुजरात आणि अन्य काही राज्यात कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढू लागल्याने कोरोनाची दुरसी लाट आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Corona patients are rise in Maharashtra, Kerala & Gujarat)समोर येत असलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. तर गुजरातमध्येही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. शनिवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या सहा हजार २८१ रुग्णांची नोंद झाली. तर केरळमध्ये चार हजार ६५० रुग्णांची नोंद झाली. गुजरातमध्ये शनिवारी कोरोनाचे २५८ नवे रुग्ण सापडले. महाराष्ट्रातील सलग दुसऱ्या दिवशी सहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली.आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी सापडलेल्या ६ हजार २८१ रुग्णांपैकी १७०० रुग्णांपेक्षा अधिक किंवा २७ टक्के रुग्ण हे मुंबई आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. राज्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या २० लाख, ९३ हजार ९१३ एवढी झाली आहे. तर ४० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून ५१ हजार ७५३ झाली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ४८ हजार ४३९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दुसरीकडे केरळमध्ये शनिवारी कोरोनाच्या चार हजार ६५० नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १३ जणांचा मृत्यू झाला. त्यासह राज्यातील एकूण बाधितांची संख्या १० लाख ३० हजारांवर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत ९ लाख ६७ हजार ६३० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५८ हजार ६०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.गुजरातमध्येही कोरोनाच्या २५८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या वाढून २ लाख ६६ हजार ८२१ झाली आहे. गुजरातमध्ये शनिवारी कुणाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मृतांची संख्या ४ हजार ४०४ वर स्थिर आहे. तर राज्यात सध्या १ हजार १६७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरातKeralaकेरळHealthआरोग्य