नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट उच्छाद घालत असतानाच केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांच्या कार्यालयाने कोरोनाच्या संसर्गाबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. (Coronavirus in India) भारतामध्ये पुन्हा एकदा सार्स CoV-2 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले की, रुग्णालयात आणि घरांमध्ये उत्तम व्हेंटिलेशनच्या माध्यमातून संसर्गाचा धोका कमी करता येऊ शकतो. उत्तम व्हेंटिलेशनमुळे एका बाधित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्गाचा धोका होण्याची शक्यता कमी राहते. (Corona virus can spread up to ten meters in the air; new guidelines issued for Masks & fans)
अॉफिस आणि घरांमध्ये व्हेंटिलेशनच्या संदर्भात सल्ला देण्यात आला की, सेंट्रल एअर मँनेजमेंट सिस्टिम असलेल्या इमारतींमध्ये सेंट्रल एअर फिल्टरमध्ये सुधारणा केल्यामुळे खूप मदत मिळू शकते. या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले की, अॉफिस, अॉडिटोरियम, शॉपिंग मॉल आदींमध्ये गैबल फँन सिस्टीम आणि रुफ व्हेंटिलेटरचा वापर करण्याची शिफारस केली आहे. या शिफारशींमध्ये सांगण्यात आले की, पंखा ठेवण्याची जागाही महत्त्वपूर्ण आहे. जिथून दूषित हवा थेट अन्य कुणाकडेही जाईल अशा ठिकाणी पंखा असता कामा नये.
भारत सरकारच्या मुख्य शास्रीय सल्लागारांच्या कार्यालयाने सांगितले की, एअरोसोल आणि ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने पोहोचतो. एअरोसोल हवेमध्ये १० मीटरपर्यंत जाऊ शकतात. संक्रमित व्यक्तीच्या दोन मीटर परिसरात ड्रॉपलेट्सच्या पडतात. बाधित व्यक्तीमध्ये लक्षणे नसली तरी त्यांच्या शरीरातून पुरेशा ड्रॉपलेट्सच्या निघू शकतात, ज्यामुळे अधिक लोक बाधित होऊ शकतात.
या सल्ल्यामध्ये सांगण्यात आले की, बाधित व्यक्तीकडून श्वास सोडणे, बोलणे, गाणे, हसणे, शिंकणे आदी क्रियांदरम्यान लाळ आणि नाकाच्या माध्यमातून ड्रॉपलेट्स आणि एअरोसोल बनू शकतात हे विषाणूच्या संसर्गाचे कारण ठरू शकतो. संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी डबल मास्क किंवा एन९५ मास वापरला पाहिजे, असा सल्ला दिला आहे.