नवी दिल्लीः जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत चालली आहे. परंतु काही दिवसांपासून जगभरात पसरलेल्या या कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. एका अभ्यासानुसार, मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होणार आहे. पण लोकांनी लॉकडाऊनचं योग्य पालन केल्यास मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून याचा प्रभाव हळूहळू कमी होऊ शकतो.टाइम्स फॅक्ट-इंडिया आऊटब्रेक रिपोर्टनुसार, भारतातल्या कोरोना विषाणूवर अभ्यास करण्यात आला असून, यात भारतात असलेल्या कोरोनासंदर्भात माहिती मिळाली आहे. हा अभ्यास ग्लोबल कन्सल्टिंग फर्म प्रोटिव्हिटी आणि टाइम्स नेटवर्कनं केला आहे. १६ एप्रिलच्या या रिपोर्टमध्ये, कोरोना भारतात कशा पद्धतीनं पसरतो आहे आणि त्याचा उद्रेक कधी होणार आहे, याबाबत माहिती देण्यात आली आहे. ८ राज्यं आणि देशातील टॉप ३ हॉटस्पॉटमधून मिळालेल्या डेटाच्या आधारावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. यात केंद्राकडून येणारे आकडे, सरकारी बुलेटिन आणि आरोग्य मंत्रालयाच्या माहितीचाही वापर करण्यात आला आहे. कोरोनाची आकडेवारी दररोज बदलत असल्यानं रुग्णांमध्ये घसरण होऊ शकतं, असंही यात सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू
कोरोनाचे रहस्य : ‘तो’ दावा आयसीएमआरने नाकारला
‘कोरोना’ विरोधातील लढ्यासाठी कायदाही सक्षम हवा; विधी तज्ज्ञांचे मत