Coronavirus : ...म्हणून 'या' डॉक्टरने कारमध्ये थाटलंय घर, मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 08:06 PM2020-04-07T20:06:46+5:302020-04-07T20:13:22+5:30

Coronavirus : डॉक्टरही आपल्या जीवाची पर्वा न करता मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहेत.

Coronavirus corona warriors doctor sachin nayak built home in car SSS | Coronavirus : ...म्हणून 'या' डॉक्टरने कारमध्ये थाटलंय घर, मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक

Coronavirus : ...म्हणून 'या' डॉक्टरने कारमध्ये थाटलंय घर, मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक

googlenewsNext

भोपाळ - कोरोनाने जगाला विळखा घातला असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 4000 वर पोहोचला आहे. तर 100 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोक कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी अहोरात्र काम करत आहेत. तसेच डॉक्टरही आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहेत. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे.

कोरोनाग्रस्तांवर उपचार करता यावेत यासाठी अनेक जण काही दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून लांब आहेत. रुग्णांची सेवा करताना त्यांनी स्वत: ला झोकून दिले आहे. मध्य प्रदेशमधील एका डॉक्टरने कुटुंबाला कोरोनाचा संसर्गापासून रोखण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून आपल्या गाडीमध्येत घर केलं आहे. सचिन नायक असं या डॉक्टरचं नाव असून ते भोपाळच्या जेपी रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. पत्नी आणि मुलाला संसर्ग होऊ नये यासाठी ते गेल्या 7 दिवसांपासून गाडीतच राहत आहेत. 

सचिन नायक यांना तीन वर्षाचा लहान मुलगा आहे. कुटुंबाला कोरोना संक्रमणापासून वाचवण्यासाठी त्यांनी गाडीलाच घर बनवून तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही या डॉक्टरला सलाम केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सचिन नायक यांचं कौतुक केलं आहे. 'कोविड – 19 च्या लढ्यात लढणाऱ्या कोरोना योद्धाचं मी आणि संपूर्ण मध्य प्रदेशची जनता अभिनंदन करते. या संकल्पासह आपण पुढे जाऊ आणि कोरोनाविरोधातील हे महायुद्ध जिंकू. सचिन तुमच्या निष्ठेला सलाम' असं शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.

दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरही कोरोना संसर्गाविरूद्ध लढा देत आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी कुटुंबापासून दूर असलेल्या एम्सच्या डॉ. अंबिका यांनी हे कोविड – 19 विरुद्ध युद्ध असल्याचं सांगितलं आहे. हे सांगताना कुटुंबियांच्या आठवणीने त्या भावुक झाल्या आहेत. 'कोविड – 19 च्या विरोधात हे युद्ध आहे. कुटुंबियांशी फोनवर बोलताना कधीकधी भीती वाटते... आपण घरापासून दूर आहोत. ते जर आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करायला जाता येणार नाही, त्यांना भेटता येणार नाही' असं अंबिका यांनी सांगितलं. कुटुंबीयांच्या आठवणीने डॉक्टरचे डोळे पाणावले. तसेच 'असं असतानाही घरच्यांनी कधीच मला घरी ये म्हणून सांगितलं नाही किंवा कोणतीही तक्रार केली नाही. सेवा करत राहा असंच ते मला नेहमी सांगत' असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : 'अर्थव्यवस्था पुन्हा उभी करता येईल, लोकांचे जीव गेले तर ते परत कसे आणणार?'

Coronavirus : 'घरचे आजारी पडले तर...', कुटुंबीयांच्या आठवणीने डॉक्टरचे डोळे पाणावले

Coronavirus : फ्रान्समध्ये कोरोनाचा हाहाकार! 24 तासांत तब्बल 833 जणांचा मृत्यू

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स हवाय?, मग 'या' ट्रिक्स करा फॉलो 

Coronavirus : सायकलसाठी जमा केलेल्या पैशांचा उपयोग भारी; 'या' चिमुकल्याची बातच न्यारी

Coronavirus : कोरोनाचा असाही फायदा! तब्बल 7 वर्षांनी कुटुंबियांना सापडला बेपत्ता मुलगा

 

Web Title: Coronavirus corona warriors doctor sachin nayak built home in car SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.