नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला असून, उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन वाढवायचा की काढायचा याचा निर्णय 130 कोटी देशवासीयांना सांगणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वच दुकानं बंद असल्यानं मद्यप्रेमींचा हिरमोड झाला आहे. अनेक राज्य सरकारं दारू विक्री सुरू करायची की नाही, यासंदर्भात विचारात पडली आहेत. हरियाणामध्ये लॉकडाऊन असूनही दारूविक्री सुरूच आहे. केरळमधील आत्महत्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सल्ल्यानं दारू पिण्याचा सल्ला देण्यात आला होता. दारूच्या दुकानांतून सरकारला महसूलही मोठ्या प्रमाणात मिळतो.दरम्यान, आसाम आणि मेघालय या दोन ईशान्यकडच्या राज्यांनी सोमवारपासून दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, आसामच्या उत्पादन शुल्क विभागाने सोमवारपासून दारूची दुकाने, गोडाऊन, बाटल्यांचे कारखाने, दारूभट्टी उघडण्यास परवानगी दिली आहे. या काळात बीअर बार पूर्णपणे बंद राहतील. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दारूची दुकानं उघडी राहतील. दुकानांमध्ये कमीत कमी कर्मचार्यांसह काम करण्याचे आणि बाटल्या किंवा रोख रक्कम घेताना ग्राहक व कर्मचार्यांना हाताला सॅनिटायझर लावावे किंवा हात स्वच्छ धुण्यास सांगण्यात आले आहे.
CoronaVirus: मद्यप्रेमींसाठी खूशखबर! 'या' दोन राज्यांत आजपासून उघडली दारूची दुकानं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 5:04 PM