शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

coronavirus: हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 7:40 PM

आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वत: खट्टर यांनी ट्विट करून दिली आहे.

ठळक मुद्देहरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह स्वत: खट्टर यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिलीयापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनाही झाला होता कोरोनाचा संसर्ग

चंदीगड - कोरोना विषाणूचा देशात होत असलेला फैलावा अद्याप कमी झालेला नाही. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रात वावरत असणाऱ्या अनेक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वत: खट्टर यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. यापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. तसेच काही केंद्रीय मंत्र्यांसह विविध राज्यांमधील मंत्र्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते.आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वत: खट्टर यांनी ट्विट करून दिली आहे. मी आज माझी कोरोना चाचणी करवून घेतली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरात जे सहकारी आणि इतर व्यक्ती माझ्या संपर्कात आले होते, अशांनी स्वत:ची कोरोना चाचणी करवून घ्यावी, तसेच माझ्या अत्यंत जवळून संपर्कात आलेल्यांनी क्वारेंटिन व्हावे, असे मी आवाहन करतो, असे आवाहन खट्टर यांनी केले.केंद्रीय गृह राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची तब्येत खालावली; दिल्लीहून संरक्षण दलाच्या डॉक्टरांचे पथक येणार उत्तर गोव्याचे खासदार, केंद्रीय आयुष मंत्री तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना दहा दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी दुपारी त्यांची तब्येत आणखी खालावली असून भारतीय संरक्षण दलाच्या रुग्णालयातील एक पथक आणि एम्सचे एक पथक सायंकाळपर्यंत गोव्यात पोहचत आहे. या पथकाने तपासणी केल्यानंतरच त्यांना दिल्लीत हलविण्यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सकाळपासून त्यांची ऑक्सिजनची पातळी उतरल्याचे ते म्हणाले.,

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHaryanaहरयाणाChief Ministerमुख्यमंत्री