नवी दिल्ली : देशामध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे १८ हजार ६५३ रुग्ण आढळल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या ५ लाख ८५ हजार ४९३ झाली असून, आजाराला बळी पडलेल्यांची एकूण संख्या १७ हजार ४०० झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनामुळे ५०७ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यात अमेरिका पहिल्या, ब्राझील दुसऱ्या, तर रशिया तिसºया स्थानावर आहे. भारतामध्ये एकूण कोरोना रुग्णांपैकी २ लाख २० हजारांहून अधिक रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून, ३ लाख ४७ हजारांहून अधिक रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, आता ते ५९.४३ टक्के इतके झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली.
कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे सुमारे पावणेदोन लाख रुग्ण एकट्या महाराष्ट्रात असून, त्यानंतर तामिळनाडू (९० हजार १६७), दिल्ली (८७ हजार ३६०) व गुजरातचा (३२ हजार ५५७ रुग्ण) क्रमांक लागतो. रुग्णवाढीचा वेग पाहता, पुढील २४ तासांत देशातील एकूण रुग्णांचा आकडा ६ लाखांच्या वर गेलेला असेल. या साथीचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांनी आता काही ठिकाणी पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, गेले पाच दिवस त्यांच्यात किमान १८ हजारांनी भर पडत आहे.सामूहिक संसर्ग झाल्याचा इन्कारदेशात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झालेला नाही या आपल्या मतावर केंद्र सरकार अद्यापही ठाम आहे. १,७४,००० पेक्षा अधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. इतर राज्यांपैकी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आतापर्यंत ७८५० पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. 90 हजारांहून अधिक रुग्ण तामिळनाडूमध्ये आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांत तामिळनाडूचा दुसरा क्रमांक लागतो. 87 हजारांहून जास्त कोरोनाचे रुग्ण दिल्लीमध्ये आहेत. 32 हजारांहून अधिक गुजरातमध्ये आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये २३ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.