शहरं
Join us  
Trending Stories
1
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
2
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
3
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
5
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
6
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
7
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
8
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
9
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
10
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
11
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
12
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
14
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
15
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
16
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
18
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
19
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
20
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

Coronavirus: कोरोनाचा धोका टळला नाही, चाचणी वाढवा; केंद्राच्या राज्य सरकारला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 8:54 PM

कोरोनाचा धोका टळला नाही. काही राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सरकारनं सतर्क राहणं गरजेचे आहे

नवी दिल्ली - देशात सध्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मागील २४ तासांत देशात ८ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे सरकारमध्ये चिंता पसरली आहे. देशात वाढणाऱ्या कोरोना संक्रमणामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण वाढवण्याचं आवाहन त्यांनी केले. 

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी सांगितले की, कोरोना संक्रमण अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण वाढवलं पाहिजे. त्याचसोबत वृद्धांना बूस्टर डोस देण्यावरही विशेष लक्ष ठेवले पाहिजे. कोरोना व्हायरसच्या विविध व्हेरिएंटची ओळख पटवण्यासाठी जीनोम सीक्वेसिंगही वाढवलं पाहिजे. सोमवारी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यातील कोरोना संक्रमणाचाही बैठकीत आढावा घेतला. 

कोरोनाचा धोका टळला नाही. काही राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सरकारनं सतर्क राहणं गरजेचे आहे. कोविड नियमांचे पालनही करावे. मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे याचीही जनजागृती लोकांमध्ये करायला हवी. काही राज्यात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णात वाढ होताना दिसत आहे. त्याचसोबत जिल्हा आणि राज्यात कोविड १९ टेस्टिंग कमी झाल्याचं दिसून आले. कोरोना चाचणीत वाढ करावी अशा सूचना केंद्राने सर्व राज्यांना दिल्या आहेत. 

महाराष्ट्रातही कोरोना रुग्णसंख्येत वाढराज्यातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील २४ तासांत १८८५ रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय ७७४ कोरोना रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले असून २४ तासांत १ हजार ११८ रुग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्रात सोमवारी रुग्णसंख्येत घट झाली तरी राज्यातील सक्रीय रुग्णांत २४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील १० दिवसांत राज्यात सक्रीय रुग्णसंख्या ५ हजार १२७ वरून आता १७ हजार ८४० इतकी झाली आहे. सोमवारी राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. मागील दहा दिवसातील कोरोना आकडेवारी घाबरवणारी आहे. मुंबईत वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे शहर कोरोना हॉटस्पॉट बनतंय का? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या