नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढत आहेत. रहिवासी भागांसोबत अनेक महत्त्वाच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूने आता सर्वोच्च न्यायालयातही धडक दिली असून, येथील एका कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी आहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला कर्मचारी 16 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात आला होता. त्यामुळे आता या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातील दोन रजिस्ट्रारांना 30 एप्रिलपर्यंत क्वारेंटिन करण्यात आले आहे. दरम्यान, देशात वाढवण्यात आलेले लॉकडाऊन 3 मे रोजी संपणार आहे. मात्र कोरोनाचे रुग्ण असणाऱ्या भागात लॉकडाऊन वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढला असून, कोरोनाबाधितांची संख्या 29 हजार 453 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 934 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानकारक बाब म्हणजे देशातील 6 हजार 869 रुग्णांनी कोरोनाला मात दिली आहे.