- हरीश गुप्ता
नवी दिल्ली - लस प्रशासनावरील उच्च पातळीवरील राष्ट्रीय तज्ज्ञ गट सध्या कोरोनावरील लस सगळ्यात आधी कुणाला द्यायची याची योजना तयार करीत आहे. यात उत्साहवर्धक बातमी अशी की, जगभर ज्या लशीच्या चाचण्या सुरू आहेत त्यापैकी किमान १० लसी यशस्वी ठरत आहेत. पंतप्रधानांच्या टास्क फोर्सकडे विविध देश आणि जागतिक संस्थांसोबत लसीच्या कार्यक्रमाला हाताळण्याची जबाबदारी आहे. या टास्क फोर्सला येत्या वर्षाच्या प्रारंभी ३ ते ४ लसी उपलब्ध होतील, अशी आशा आहे.
टास्क फोर्सचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी लस उपलब्धतेचा आढावा घेतला. जगात आज १० लसी तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीत असून, त्यातील भारतात किमान तीन लसी या चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. या दहा लसींशिवाय चीनच्या पाच लसींच्या २० देशात चाचण्या सुरू आहेत. व त्यातील एका लसीत यशाची काही चिन्हे दिसत आहेत. यूएईच्या मंत्र्याने गेल्या आठवड्यात चीनची कोरोना लस टोचून घेतली होती. त्याला बरे वाटत आहे. भारत बायोटेक आयसीएमआरचे संयुक्त औषध कोव्हॅक्सिन झायडस कॅडिला (टप्पा २) आणि सिरम अॅसट्रा जेनेकाची कोविडशिल्ड टप्पा ३ पायरीवर आहे.
याशिवाय हैदराबाद येथील बा्योलॉजिकल ई ही कंपनीही लसीची चाचणी करीत आहे. स्फुटनिक व्ही ही रशियाची लस टप्पा २ वर असून, तिने तिसऱ्या टप्प्यासाठीचा अडथळा पार केला आहे. १५४ लसी ह्या प्रीक्लिनिकल टप्प्यात तर ४४ लसी ह्या क्लिनिक टप्प्यात आहेत. त्यातील १० लसी या चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. या चाचण्यांचे मोठे यश हे पुढील वर्षाच्या प्रारंभी दिसेल.