चेन्नई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मात्र कोरोना विषाणूविरोधात विकसित होत असलेल्या लसीमुळे या संकटामधून मार्ग निघण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. दरम्यान, कोरोनावरील लस येण्याचे संकेत मिळताच विविध राज्यांमधील सरकारांकडून लसीकरणाबाबतच्या घोषणा होऊ लागल्या आहेत.भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांपैकी एक असलेल्या तामिळनाडूमध्ये लसीकरणाबाबत राज्य सरकारने आज मोठी घोषणा केली आहे. तामिळनाडूमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस मोफत दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री के. पलानीसामी यांनी केली आहे.
coronavirus: प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस मोफत देणार, या राज्यातील सरकारने घेतला मोठा निर्णय
By बाळकृष्ण परब | Published: October 22, 2020 6:39 PM
Corona Vaccine News : कोरोना विषाणूविरोधात विकसित होत असलेल्या लसीमुळे या संकटामधून मार्ग निघण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे.
ठळक मुद्देतामिळनाडूमध्ये लसीकरणाबाबत राज्य सरकारने आज मोठी घोषणा केली आहेतामिळनाडूमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस मोफत दिली जाईलराज्याचे मुख्यमंत्री के. पलानीसामी यांनी केली घोषणा