- सोपान पांढरीपांडे नागपूर : जागतिक स्वास्थ्य संघटनेचे सांसर्गिक रोग विशेषज्ञ डॉ. पीटर बेन एम्बारेक यांनी कोविड-१९ हा विषाणू चीनमधील वुहानमध्येच तयार झाल्याचा आरोप नव्याने केल्याने कोविड-१९ ची साथ हे जैविक युद्ध असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.अमेरिकेन वृत्तपत्रांनी शुक्रवारी दिलेल्या वृत्तानुसार, कोविड-१९ हा विषाणू वुहान व्हायरॉलॉजी लॅबोरेटरीजमध्ये तयार झाला व त्याचा जगभर प्रसार करण्यासाठी मध्यवर्ती वुहानमधील एका ठोक मासळी बाजाराचा उपयोग करण्यात आला, असाही आरोप डॉ. एम्बारेक यांनी केला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेई यांनी याला दुजोरा दिला आहे. सध्या जगभर १८० देशांत कोविड-१९ मुळे लॉकडाऊन घोषित झाला आहे व जागतिक अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. एप्रिलमध्ये एकट्या अमेरिकेत २ कोटी व्यक्ती बेरोजगार झाल्या आहेत तर भारतातील बेरोजगारी २७ टक्क्यांवर (१४ कोटी बेरोजगार) गेल्याचा निष्कर्ष सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनामीने (सीएमआयई) काढला आहे. त्यामुळे स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी चीनने जैविक युद्ध सुरू केले आहे, अशी चर्चा गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होती. तिला डॉ. एम्बारेक यांच्या आरोपाने बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी जगात आलेल्या साथीच्या रोगांचा उदाहरणार्थ सीव्हीआर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोमचा (सार्स) मृत्यूदर १० टक्के हाता. त्यानंतर आलेल्या मिडल-ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोमचा (मेर्स) मृत्यूदर तब्बल ३४ टक्के हाता. परंतु त्यावेळी कुठलेही लॉकडाऊन झाले नव्हते. आता कोविड-१९ चा मृत्यूदर केवळ २ टक्के असताना संपूर्ण जगच बंद केले गेले आहे. यावरूनही कोविड-१९ हीसाथ जैविक युद्ध असण्याला दुजारा मिळतो.बायोलॉजिकल वेपन कन्वेन्शन : मार्च १९७५ मध्ये जगातील १८३ देशांनी बायोलॉजिकल वेपन कन्वेन्शनवर सह्या केल्या. यात कुठल्याही देशाने जैविक विषाणू तयार करू नये व त्याचा वापर हत्यार म्हणून मानवजातीविरुद्ध करू नये, असे ठरले होते. चीन, अमेरिका व भारत हे देशही या कराराचे सदस्य आहेत. १९७८ मध्ये चीनने आर्थिक उदारवादाचा पुरस्कार केल्याने चीनची औद्योगिक प्रगती सुरू झाली व नंतरच्या ३५-४० वर्षांत चीन ही जगातील दुसरी आर्थिक सत्ता (अमेरिकेनंतर) बनली आहे. दोन्ही देशात गेल्यावर्षी व्यापार युद्ध सुरू झाले व एकमेकांच्या मालांवर अतिरिक्त आयात शुल्क आकारण्याचा प्रकार सुरू झाला. याचाच पुढील भाग जैविक युद्धाचा आहे व तो चीन कोविड-१९ मार्फत लढत असल्याची शक्यता आहे.अधिकृत आरोप नाही : विशेष म्हणजे, अमेरिकेने चीनविरुद्ध अजूनही जैविक युद्ध छेडण्याचा आरोप केलेला नाही. परंतु दोन्ही देश भारताचा यात उपयोग करून घेत आहेत. भारताने मात्र जागतिक स्वास्थ्य संघटनेने हा करार सक्तीने लागू करावा, अशी मागणी केली आहे.
coronavirus: कोविड-१९ हे तर जैविक युद्ध! जागतिक स्वास्थ्य संघटनेचे सांसर्गिक रोग विशेषज्ञ डॉ. पीटर बेन एम्बारेक यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 5:14 AM