शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

CoronaVirus News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण तिप्पट करणार- गृहमंत्री अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 3:52 AM

गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला दिल्लीतील परिस्थितीचा आढावा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधील कोविड-१९ च्या महामारीचा वाढता प्रसार लक्षात घेता येत्या सहा दिवसांत शहरांत कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवून सध्याच्या तिप्पट केले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे जाहीर केले.दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजाल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शहा यांनी दिल्लीतील कोरोना साथीचा आढावा घेतला. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी केंद्राकडून दिल्ली सरकारला सर्व प्रकारची मदत व सहकार्य देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले.शहा म्हणाले की, चाचण्यांचे प्रमाण येत्या दोन दिवसांत दुप्पट व सहा दिवसांत तिप्पट केले जाईल. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत शहरातील ‘कंटेन्मेंट झोन’मधील प्रत्येक मतदानकेंद्रावर कोरोना चाचणीची सोय उपलब्ध करून दिली जाईल. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांसाठी इस्पितळ खाटांची कमतरता जाणवत असल्याने खास दिल्लीसाठी इस्पितळ म्हणून वापरता येतील, अशा प्रकारे पूर्मपणे सुसज्ज केलेले रेल्वेचे ५०० प्रवासी डबेही उपलब्ध केले जातील, असेही त्यांनी सांगितले. यामुळे पाच हजार अतिरिक्त रुग्णखाटा उपलब्ध होतील.फलदायी बैठकगृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतची बैठक खूपच फलदायी झाली व त्यात अनेक महत्त्वाचे निर्णय झाले, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी बैठकीनंतर सांगितले. केंद्र व दिल्ली सरकार मिळून एकजुटीने राजधानीतील कोरोना संंकटावर नक्कीच मात करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दिल्लीमधील ९ ते ४९ खाटांची सोय असलेली सर्व मल्टी स्पेशालिटी नर्सिंग होम यापुढे कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी राखून ठेवण्याचा आदेश दिल्ली सरकारने रविवारी काढला. यामुळे ५००० अतिरिक्त रुग्णखाटा उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmit Shahअमित शहा