नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. देशातही वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत 1553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 17265 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे.
देशातील 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 59 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 28 दिवसांत पुदुचेरीमधील माहे आणि कर्नाटकातील कोडागु आणि उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. गोवा राज्य पूर्णपणे कोरोना मुक्त झाले आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
याचबरोबर, देशात गेल्या 24 तासांत 1553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 17265 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, असे लव अग्रवाल यांनी सांगितले.
गृह मंत्रालयाचे लॉकडाऊनवर लक्षकेंद्रीय गृह मंत्रालय देशभरातील लॉकडाऊन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन झाल्यानंतर संबंधित राज्यांना त्यासंबंधी नियमांच्या सूचना मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून देण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या नियमांचे पालन करण्याचे राज्यांना आवाहन केले जात आहे, असे गृह मंत्रालयाच्या सह सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले.