नवी दिल्ली : वरिष्ठ अधिकाऱ्याच्या खासगी सचिवाला व एका बसचालकाला कोरोना झाल्याचे उघडकीस आल्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दिल्लीतील मुख्यालय तात्पुरती सील करण्यात आले आहे, तसेच विशेष महासंचालक पदाच्या स्तरावरील अधिकाऱ्यांसह ४० कर्मचाºयांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
मयूरविहार येथील ३१ बटालियन युनिटच्या १३५ जवानांना कोरोनाचा विळखा बसल्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) इतरही युनिटमध्ये कोरोना पोहोचला आहे. त्यात विशेष महासंचालक पदावरील एका अधिकाºयाच्या खासगी सचिवाचे नमुने तपासण्यासाठी गेले होते. त्याचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने मुख्यालय सील करण्यात आले.दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफनंतर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना कोरोनाचा विळखा बसला आहे. आतापर्यंत १७ जवानांना संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे.आणखी दोन डॉक्टर...कस्तुरबा गांधी रुग्णालय व हिंदू राव रुग्णालयातील दोन डॉक्टर व एक परिचारिका, अशा ३ आरोग्यसेवकांना संसर्ग झाल्याचे रविवारी समोर आले. आणखी शंभराहून अधिक आरोग्यसेवकांचे अहवाल यायचे आहेत. दिल्लीतील बाधित आरोग्य सेवकांची संख्या आता तीनशेच्या आसपास पोहोचली असून, यात परिचारिकांचे सर्वाधिक प्रमाण आहे.