शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

CoronaVirus क्रूर थट्टा! तुमचा मृत्यू झालाय, पैसे कसे देऊ? वृद्धेला बँक कर्मचाऱ्याचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 10:06 AM

लॉकडाऊनमुळे धवरी टोला गावातील गरीब महिला चानो देवी यांना पैशांची गरज होती. अशातच त्यांनी ग्रामीण बँकेकडून सामाजिक सुरक्षा योजनेद्वारे पैसे दिले जात असल्याचे समजले. म्हणून

छपरा : लॉकडाऊनमुळे गरीबांचे हाल बेहाल झाले आहेत. अशातच बिहारमध्ये एका बँकेमध्ये वृद्धेची क्रूर थट्टा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जनधन खात्यातील पैसे काढण्यास गेलेल्या एका वृद्धेला तुम्ही मयत आहात, तुमच्या खात्यातून पैसे करे देऊ? असे धक्कादायक उत्तर मिळाल्याने तिच्यावर वेगळेच संकट कोसळले आहे. आता या महिलेला ती जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रशासनाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. 

ही घटना मागील आठवड्यातील आहे. लॉकडाऊनमुळे धवरी टोला गावातील गरीब महिला चानो देवी यांना पैशांची गरज होती. अशातच त्यांनी ग्रामीण बँकेकडून सामाजिक सुरक्षा योजनेद्वारे पैसे दिले जात असल्याचे समजले. म्हणून त्या सकाळी सकाळीच बँकेत गेल्या होत्या. चाने देवी पैसे काढण्यासाठी काऊंटरवर गेली तेव्हा तिला तिचे खाते बंद झाल्याचे समजले. तिने कारण विचारले असता उत्तर ऐकून धक्काच बसला. तुमचा मृत्यू झाला आहे, यामुळे तुमचे खाते बंद करण्यात आल्याचे चानो देवीला सांगण्यात आले. 

हे ऐकल्यानंतर चानो देवीला धक्का बसला. तिला समजच नव्हते की हे कसे झाले. एकीकडे लॉकडाऊन, वरून पैशांची चणचण आणि आता समोर स्वत:ला जिवंत असल्याचे सिद्ध करण्याची धडपड अशी संकटे येऊन ठेपली होती. अखेर तिने बँकेमध्येच याचे कारण विचारले. तेव्हा तिला आणखी मोठा धक्का बसला. तिच्या गावची सरपंच पूनम देवी हिनेच चानो देवी मृत झाल्याचे प्रमाण पत्र बँकेला दिले होते. सरपंच महिलेने चानो यांचा ९ ऑक्टोबर २०१९ मध्येच मृत्यू झाल्याचे लेचर हेडवर लिहून बँकेला दिले होते. धक्कादायक म्हणजे या पत्रावर सरपंचाच्या मुलाची सही आहे. एरव्ही सही जुळत नाही म्हणून खातेधारकांना, चेक वटविण्यासाठी रडकुंडीला आणणाऱ्या बँकेला सरपंचाची सही कशी ओळखता आली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसून खात्यातील पैसेच तिच्याकडे शेवटचे आहेत. आता तिची मदत कोण करणार असा प्रश्न चानो देवीने उपस्थित केला आहे. तर बँकेच्या अधिकाऱ्यांनी यावर कारवाई सुरु असल्याचे सांगितले आहे. 

टॅग्स :bankबँकDeathमृत्यू