शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
2
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
3
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
4
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
5
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी
6
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
7
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
8
ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर
9
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?
10
संकटकाळी ज्यांना मदत, त्यांनीच फाेडला पक्ष; शरद पवारांचा परळीतून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
11
मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार!
12
दोन वर्षांच्या बालिकेची अत्याचार करून हत्या; विकृत सावत्र बापाचे निर्घृण कृत्य
13
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
14
एक बातमी अन् शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड, 2 दिवसात 44% ची तेजी
15
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
16
महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!
17
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली
18
“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे
19
वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
20
"पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल"; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, "तुमचा करेक्ट कार्यक्रम..."

कोरोनाने वाढवली चिंता! गेल्या 7 दिवसांत 78 टक्के प्रकरणे वाढली, मृत्यूची संख्याही वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2023 7:48 AM

coronavirus daily case : गेल्या सात दिवसांतील प्रकरणांची गेल्या सात दिवसांशी तुलना केल्यास, कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये 78 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर या कालावधीत 19 वरून 29 मृत्यूची नोंद झाली आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आणि मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या शनिवारी कोरोना विषाणूची 1890 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, जी गेल्या 210 दिवसांतील सर्वाधिक आहे. गेल्या सात दिवसांतील प्रकरणांची गेल्या सात दिवसांशी तुलना केल्यास, कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये 78 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर या कालावधीत 19 वरून 29 मृत्यूची नोंद झाली आहे. शनिवारी समोर आलेल्या कोरोना विषाणूची प्रकरणे गेल्या वर्षी 22 ऑक्टोबरनंतर देशात सर्वाधिक होती, तेव्हा 1,988 नवीन प्रकरणे नोंदवली गेली.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, गेल्या सात दिवसांत (19-25 मार्च) भारतात कोरोना विषाणूची 8,781 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, जी मागील सात दिवसांतील 4,929 पेक्षा 78 टक्के जास्त आहे. हे मागील आठवड्यात दिसलेल्या 85 टक्के वाढीइतके आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. देशातील दैनंदिन प्रकरणे आठ दिवसांत दुप्पट होत आहेत. रोजच्या प्रकरणांची सात दिवसांची सरासरी शनिवारपर्यंत 1,254 वर पोहोचली होती, जी आठ दिवस आधी (17 मार्च) 626 होती.

महाराष्ट्रात वाढली रुग्णांची संख्यायाचबरोबर, सलग दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात गेल्या सात दिवसांत देशात सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 19 ते 25 मार्च दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाची 1,956 प्रकरणे नोंद झाली आहेत. 12 मार्च ते 19 मार्च या कालावधीत 1,165 प्रकरणे समोर आली आहेत. जी आता 68 टक्के अधिक आहे. बहुतेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये हरयाणा, दिल्ली, यूपी, गुजरात, हिमाचल आणि गोवा यांचा समावेश आहे.

दिल्लीत कोरोनाची 153 नवीन प्रकरणेरविवारी दिल्लीत कोरोनाची 153 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. यादरम्यान कोरोनाचा संसर्ग दर 9.13 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिल्लीत 4.98 टक्के कोरोना संसर्ग दरासह 139 प्रकरणे नोंदवली गेली. शुक्रवारी 6.66 टक्के संसर्ग दरासह 152 प्रकरणे नोंदवली गेली, तर गुरुवारी 4.95 टक्के संसर्ग दरासह 117 प्रकरणे नोंदवली गेली. तसेच, राष्ट्रीय राजधानीत गेल्या ऑक्टोबरमध्ये तीन अंकी प्रकरणांची नोंद झाली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या