नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानं केजरीवाल यांनी स्वत:ला आयसोलेट केलं होतं. आज सकाळी त्यांची कोरोना चाचणी झाली. त्याचा अहवाल थोड्याच वेळापूर्वी प्राप्त झाला. ही चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज सकाळी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानं दिल्ली सरकार, आम आदमी पार्टी आणि केजरीवालांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना झाल्याचा संशय आल्यानं रविवार दुपारपासून केजरीवाल घरातच वेगळे राहू लागले. त्यांची प्रकतीही बिघडली आहे. तापासह घशात खवखव सुरू आहे. त्यामुळेच आज सकाळी त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली.अरविंद केजरीवाल यांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यांनी रविवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. त्यामध्ये दिल्लीतील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये केवळ दिल्लीतील नागरिकांवरच उपचार करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मात्र कालच नायब राज्यपालांनी हा निर्णय बदलला. रविवारी घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर केजरीवाल यांना ताप आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी कोणाचीही भेट घेणं टाळलं. त्यांनी त्यांच्या सगळ्या बैठका रद्द केल्या. ...म्हणून भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईला दिल्लीच्या रुग्णालयात केलं दाखलड्रायव्हिंग लायसन्स, PUCची मुदत संपली तरी घाबरू नका; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा भारताला मोठं यश; लडाखमध्ये चिनी सैन्याची अडीच किलोमीटरपर्यंत माघार