नवी दिल्ली – देशात कोरोनामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असताना या रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना पगार मिळत नसल्याचं धक्कादायक वास्तव दिल्लीत समोर आलं आहे. उत्तर दिल्ली महापालिकेतंर्गत येणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या एका गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे डॉक्टरांनी मागील तीन महिन्यापासून पगार न मिळाल्याची व्यथा मोदींकडे मांडली आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन डॉक्टर्स असोसिएशनने हे पत्र मागील आठवड्यात ईमेलवरुन पाठवलं आहे.
असोसिएशनने लिहिलेल्या या पत्रात म्हटलं आहे की, कोरोना व्हायरस महामारीमुळे संपूर्ण देशात तणावपूर्ण वातावरण आहे. डॉक्टर असल्याकारणाने रुग्णांची सेवा करणे हे आमचं कर्तव्य आहे, मागील तीन महिन्यापासून आम्हाला पगार मिळाला नाही. आम्ही जास्त काही मागत नाही पण जे वेतन आहे तेवढं द्यावं अशी मागणी डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. यावर दिल्ली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.
देशात कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा ७० हजारांच्या वर पोहचला आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या ७ हजार २३३ इतकी झाली आहे तर आतापर्यंत ७३ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोरोनामुळे अमेरिकेत वाढला मृतांचा आकडा; तरीही ट्रम्प उचलणार ‘हे’धोकादायक पाऊल?
“सरकारने आधी कोरोनाच्या तिरडीवरून उठावे; लोक आपोआप कामधंद्याला लागतील”
चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप
तरुणांनो, सावधान... पुणे शहरातील कोरोनाबाधितांमध्ये २० ते ६० दरम्यान सर्वाधिक रुग्ण