नवी दिल्ली - कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले आव्हान दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालले आहे. कोरोनाा रोखण्यासाठी लागू करण्यात येणारे लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगसारख्या नियमामुळे अनेक उद्योगघंद्यांवर परिणाम झाला आहे. तसेच सर्वसामान्यांच्याही अर्थाजनाचे मार्ग खुंटले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांची मदत व्हावी यासाठी दिल्लीसरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने मुख्यमंत्री घर घर राशन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून, या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धान्याचा घरपोच पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
दरम्यान, जून महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने दिल्ली सरकार आणि आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला होता. मात्र प्रभावी उपाययोजना करून दिल्लीतील कोरोना नियंत्रणात आणण्यात शासन आणि प्रशासनाला यश आले आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या दिल्लीने कमी दिवसांत कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच मृत्यूदर देखील कमी झाल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. मात्र आता परिस्थिती सुधारत आहे. खबरदारीचे योग्य उपाय केले जात असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी