नवी दिल्ली : जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 24 लाख 30 हजारांवर गेली असली तरी त्यापैकी सुमारे 6 लाख 38 हजार रुग्ण बरेही झाले आहेत. मात्र या संसर्गजन्य आजाराने 1 लाख 66 हजार जणांचा बळीही घेतला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आजपर्यंत 500 हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 17,000 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. याच दरम्यान एक दिलासादायक घटना समोर आली आहे.
दिल्लीमध्ये कोरोनाग्रस्ताच्या प्रकृतीत एका थेरपीमुळे सुधारणा झाल्याची घटना घडली आहे. एका 49 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. यामध्ये त्या रुग्णाची प्रकृती सुधारली असून त्याचे दोन रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णाची चाचणी घेतल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली. तेव्हापासूनच त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं.
दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात या रुग्णाला प्लाझ्मा थेरपी दिली गेली. या थेरपीनंतर आता रुग्णाच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे. तसेच त्यांना व्हेंटिलेटरवरून हटवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. रुग्णाची प्रकृती सुधारत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्याची मागणी केली. त्यानंतर रुग्णाला प्लाझ्मा दिला गेला. यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत सतत सुधारणा होत गेली. चार दिवसांनी म्हणजे त्यांना व्हेंटिलेटरवरून हटवण्यात आलं. तसेच त्यांच्या दोन टेस्टही निगेटिव्ह आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी भारतात लवकरच 'या' थेरपीचा होणार वापर
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी करण्यास मान्यता दिली आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील 800 मिली रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात मोठ्या प्रमाणात प्रभावी असल्याचे सिद्ध होते.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus: दिलासादायक; कोरोना संसर्गाचा वेग मंदावला; रुग्ण दुपटीचा कालावधी ७ दिवसांवर
CoronaVirus: राज्यात कोरोनाचा वाढला प्रकोप; एकट्या मुंबईत तीन हजारहून अधिक रुग्ण