शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

Delta Plus Variant : केंद्रानं जारी केल्या गाइडलाइन्स, 'टीटीव्ही'वर भर; 8 राज्यांतील 'या' 11 जिल्ह्यांना दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 9:14 PM

CoronaVirus Delta Plus Variant: कोरोना महामारीचा कहर नेमका केव्हा थांबणार, हे आज तरी कुणीही सांगू शकत नाही. या व्हायरसच्या नव-नव्या रुपांनी मानव जातीला संकटात टाकले आहे.

नवी दिल्ली - देश अद्यापही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचाच सामना करत आहे. असे असानाच डेल्टा प्लसच्या रुपात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशात, केंद्र सरकारने राज्यांना सावध करायला सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 8 राज्यांतील मुख्य सचिवांना पत्र लिहून डेल्टा प्लसचा सामना करण्यासाठी तयारीत राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि व्हॅक्सीनेशन (टीटीव्ही) या तीन गोष्टींवर विषेश भर देण्यात आला आहे. (CoronaVirus Delta plus center issued guidelines emphasis on ttv warned 11 districts)

कोरोना महामारीचा कहर नेमका केव्हा थांबणार, हे आज तरी कुणीही सांगू शकत नाही. या व्हायरसच्या नव-नव्या रुपांनी मानव जातीला संकटात टाकले आहे. आता कोरोनाचे डेल्टा प्लस नावाचे संकट उंबरठ्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही सावध झाले आहे. केंद्राने राज्यांनाही सतर्क केले आहे. आतापर्यंत देशातील 12 राज्यांत डेल्टा प्लसचे 52 रुग्ण समोर आले आहेत.

CoronaVaccination : कोरोना, लसीकरणावर PM मोदींची समीक्षा बैठक, डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण करण्याचे लक्ष्य

'या' 8 राज्यांना आणि 11 जिल्ह्यांना देण्यात आलाय इशारा - आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पंजाब, कर्नाटक, राजस्थान आणि तामिळनाडू या आठ रांज्यांतील 11 जिल्ह्यांना केंद्र सरकारने इशारा दिला आहे. यात, तामिळनाडूतील मदुरई, कांचीपुरम आणि चेन्नई, राजस्थानातील बिकानेर, कर्नाटकातील म्हैसूर, पंजाबमधील पटियाला आणि लुधियाना, जम्मू काश्मीरमधील रियासी, हरियाणातील फरिदाबाद, गुजरातमधील सूरत तथा आंध्र प्रदेशातील तिरुपती या जिल्ह्यांचा समावेश आहे.

यापूर्वी, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळला देण्यात आला होता इशारा -दोन दिवसांपूर्वीच आरोग्य मंत्रालयाने मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांनाही इशारा दिला होता. या राज्यांना डेल्टा प्लसपासून सतर्क रहायला सांगितले होते.

राज्य सरकारांनी करावा 'हा' उपाय -केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, की नव्या व्हेरिएंटचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. याचा सामना करण्यासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि लसीकरणाचा वेग वाढवावा. याशिवाय ज्या ठिकाणी डेल्टा प्लसचा रुग्ण आढेळेल, त्या ठिकाणी स्ट्रिक्ट कंटेनमेन्टची व्यवस्था करावी. 

CoronaVirus : 72 वर्षांचे आजोबा 43 वेळा कोरोना पॉझिटिव्ह! त्रस्त होऊन पत्नीला म्हणाले- आता मरू दे; पण...

गाइडलाइन्समध्ये 'हे' उपायही सांगितले - - गर्दी रोखणे, लोकांच्या एकत्रित येण्यावर आणि रहदारीवर नियंत्रण आणणे. - जेथे डेल्टा प्लसचा रुग्ण आढळेल, तेथे तत्काळ कंटेनमेंट झोन करावा.- निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.- संक्रमितांचे नमुने तत्काल जीनोम अनुक्रमणासाठी पाठवावे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारHealthआरोग्य