नवी दिल्ली - देशभरातून एकत्रित केलेल्या नमुन्यांच्या जिनोम सिक्वेंसिंगमधून स्पष्ट होते, की कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट (B1617.2) कोरोना व्हायरस महामारीचे सर्वात मोठे कारण बनला आहे. सार्स-कोव्ह-2 जिनोमिक्स कंसोर्शिअमने (INSACOG) म्हटले आहे, की लस कोरोना व्हायरसविरोधात अत्यंत चांगल्या प्रतिची सुरक्षितता प्रदान करते, असे जिनोम सिक्वेंसिंगच्या परिणामांवरून समोर आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, डेल्टा व्हेरिएंट व्हायरसच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अनेक पट संक्रमक आणि धोकादायक आहे. (CoronaVirus Delta variant is weakening by penetrating the vaccines protective shield but the danger remains)
देशात 87% संक्रण डेल्टा व्हेरिएंटमुळे - देशात मे-जून महिन्यात करण्यात आलेल्या जिनोम सिक्वेंसिंगच्या परिणामांनुसार, 87% संक्रमण डेल्टा व्हेरिएंटमुळेच होत आहे. तसेच, अमेरिकेत 83% संक्रमणाचे कारण हाच व्हेरिएंट आहे. लस घेतल्यानंतर संक्रमित होणाऱ्या अधिकांश लोकांत डेल्टा व्हेरिएंटचाच परिणाम दिसून येतो मात्र, लस घेतल्यानंतर डेल्टा व्हेरिएंटचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो. आणि संक्रमित झालेल्या फार कमी लोकांवर रुग्णालयात भरती होण्याची वेळ येते. लस घेतल्यानंतर संक्रमणामुळे मृत्यू होण्याचा आकडा तर आणखी कमी आहे.
लसीमुळे कमजोर पडतोय डेल्टा व्हेरिएंट -आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, लस घेतल्यानंतर संक्रमित होणाऱ्या केवळ 9.8% लोकांनाच रुग्णालयात भरती होण्याची गरज पडत आहे. तर त्यांच्या मृत्यूचे प्रमाण 0.4% एवढे आहे. देशात जवळपास एक तृतियांश (33%) लोकसंख्येला अजूनही कोरोनाचा धोका आहेच, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) नुकत्याच केलेल्या सीरो सर्व्हेतून समोर आले आहे.
कोरोना काही थांबेना!; निम्म्या जनतेचे लसीकरण तरीही विदेशात रुग्णसंख्या वाढतीच
कोविड प्रॉटोकॉल आणि लसीकरण अत्यंत आवश्यक -इन्साकॉगने सध्यस्थिती लक्षात घेत लसीकरण आणि कोविड प्रॉटोकॉल्सचे पालन करण्यावर अधिक जोर दिला आहे. त्यांनी म्हटले आहे, 'देशभरात डेल्टाचा हाहाकार सुरूच आहे. जनतेच्या एका वर्गाला अजूनही याचा धोका आहेच. संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण आणि लोकांचे योग्य वर्तन अधिक आवश्यक आहे.'
काही राज्ये आणि जिल्हांची स्थिती चिंताजनक -केरळ आणि महाराष्ट्रासारखी राज्ये देशासाठी चिंतेचा विषय बनली आहेत. येथे अद्यापही कोरोना नियंत्रणात नाही. राजस्थान आणि इशांन्येकडील राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट उच्च पातळीवर आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी, अधिकांश कोरोना रुग्ण समोर येणाऱ्या आणि ज्यांच्यामुळे देशात महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता वाटते, अशी काही राज्ये आणि जिल्हे मार्क केली आहेत. देशात मंगळवारी 42,015 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत.