नवी दिल्ली- कोविड-19 संक्रमणमागचे कारण SARS-Cov-2 व्हायरस आहे. आतापर्यंत पेशन्ट झीरो मिळाला असता, तर याच्या उत्पत्तीचा शोध लावण्याचा प्रयत्न केला गेला नसता. पेशेन्ट झीरो एक मेडिकल शब्द आहे. याचा अर्थ अशा रोग्याशी आहे, ज्यात सर्वप्रथम महामारीची माहिती मिळते. यावर्षी जानेवारी महिन्यात, "आपण पेशन्ट झीरो कोण होता, हे कधीही शोधू शकणार नाही," असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. (CoronaVirus desi expert in effort to trace origins of covid-19 traces great grandpa of sars cov-2)
मात्र, व्हायरसच्या पूर्वजाची माहिती मिळविण्यासाठी एक पद्धत होती. दिल्लीतील मॉलीक्यूलर महामारी शास्त्रज्ञाने डेटासह SARS-Cov-2 च्या पूर्वज व्हायरसचा इतिहास शोधून काढला आहे. यानुसार, प्रोगिनेटर अथवा पूर्वज जिनोम, किमान ऑक्टोबर 2019 च्या जवळपास होता आणि मार्च 2020 पर्यंत जिवंत होता. हा पूर्वज व्हायरस कोरोना व्हायरसच्या जिनोममद्ये दिसून आला आहे. जो एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत संक्रमणाचा प्रसार करतो.
Coronavirus Vaccine: भारत इतिहास घडवणार; अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्यावर कोरोना लसीची चाचणी होणार
इंस्टिट्यूट फॉर जिनोमिक्स अँड इव्होल्यूशनरी मेडिसिन, टेम्पल युनिव्हर्सिटीचे संचालक डॉ सुधीर कुमार यांनी टीओआयला दिलेल्या माहितीनुसार, 24 डिसेंबर 2019 नंतर (जेव्हा पहिला रुग्ण समोर आला होता) सर्वच जण नव्या स्ट्रेनच्या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्सूक होते. तायच प्रमाणे, कोणता स्ट्रेन आधी आला, हे जाणण्याची उत्सुकता आम्हालाही होती. ते म्हणाले, आम्ही आपल्याला या कोरोना व्हायरसच्या पूर्वज व्हायरसच्या अस्तित्वाचा काळ सागू शकतो. हा काळ ऑक्टोबर 2019 च्या आधीचा अथवा त्याच्या जवळपासचा आहे.
पहिल्या रुग्णाच्या दोन महिने आधी, रेफरन्स जिनोम सिक्वेंससंदर्भात भविष्यवाणी करण्यात आली होती. ज्याचा उपयोग आता केला जात आहे. मात्र, पूर्वज व्हायरस नष्ट झालेला नव्हता. कुमार म्हणाले, "आम्हाला असे दिसून आले, की व्हायरसपासून निघालेला त्याचा अंश संक्रमण पसरवल्यानंतरही अस्तित्वात होता. तो जानेवारी 2020 मध्ये चीनमध्ये आणि मार्च 2020 मध्ये अमेरिकेत अस्तित्वात होता. "
डॉ. सुधीर कुमार यांनी म्हटले आहे, की पूर्वज व्हायरसला पसरण्यासाठी म्यूटेशनची आवश्यकता नव्हती. त्याचा तोच पसरण्यासाठी तयार होता. SARSCoV-2 हा याचा पणतू आहे, जो याच्या तीन म्युटेशननंतरचा आहे. या निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी कुमार आणि त्यांच्या टीमने म्यूटेशन ऑर्डर अॅनालिसिस प्रोसेसचा वापर केला. या प्रोसेसचा वापर सर्वसाधारणपणे ट्यूमरमधील म्यूटेशनचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. या अभ्यासाचा निष्कर्ष ऑक्सफोर्डच्या अॅकॅडमिक जर्नल 'मॉलिक्युलर बायोलॉजी आणि इव्होल्यूशन' मध्ये प्रकाशित झाला होता.