नवी दिल्ली : एका लहानश्या विषाणूने अवघे जग उद्ध्वस्त केले आहे. संपूर्ण जग जीव वाचविण्यासाठी लढा देत आहे. कोरोनामुळे ओढवलेल्या अभूतपूर्व संकटांची कोणी कल्पनाही केली नव्हती. हे संकट भारतासाठी एक संदेश आणि संधी घेऊन आले आहे. सर्व नियमांचे पालन करुन बचाव करण्यासह आम्हांला पुढेही जायचे आहे, असा संदेश देत पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी २० लाख कोटी रुपयांची विशेष आर्थिक योजना घोषित केली. तसेच चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे नियम आणि नवीन स्वरुप असल्याचे संकेत दिले.देशवासियांना मंगळवारी संदेश देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. निश्चयाने भारत स्वावलंबी होऊ शकतो. शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाल दिलासा देण्यासाठी घोषित २० लाख कोटींच्या विशषे आर्थिक योजने स्वावलंबी भारताला गती मिळेल. सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने घोषित केलेल्या निर्णयांसह हे विशेष आर्थिक पॅकेज २० लाख कोटींचे असेल. ते देशाच्या ढोबळ उत्पादनाच्या (जीडीपी) १० टक्के आहे. या पॅकेजची विस्तृत माहिती वित्तमंत्री निर्मला सीतारामण येत्या काही दिवसांत देतील.भारताच्या स्वालंबनात जगाच्या प्रगतीचाही समावेश असतो. स्वावलंबी भारतजागतिक सुख, सहकार्य आणि शांततेची चिंता वाहत असतो. भारत आत्मकेंद्रीत व्यवस्थेची तरफदारी करीत नाही. भारताच्या कार्याचा प्रभाव जगाच्या कल्याणावर पडतो.टीबी, कुपोषण किंवा पोलियाविरोधी भारतीय मोमिहेचा प्रभाव जगावर पडतोच. इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणजे ग्लोबल वार्मिंगविरुद्ध भारताची देणगी आहे. आंतरराष्टÑीय योग दिवस मानवी जीवन तणावमुक्त करण्यासाठी भारताने जगाला दिलेली भेट होय. कच्छमध्ये आलेल्या विध्वसंक भूकपांचाही उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्वत्र ढिगारे ढिगारेच होते. सर्व काही उद्ध्वस्त झाले होते. परिस्थिती बदलेल, असे तेव्हा कोणालही वाटले नव्हते. परंतु, कच्छ सावरले, उभे राहत पुढेही गेले. हीच भारतीयांची संकल्पशक्ती आहे. ही शक्ती भारताला स्वावलंबी बनवू शकते.खचणे, थकणे मानवाला मान्य नाही...सतर्क राहत आम्हांला सर्व नियमांचे पालन करुन कोरोनाविरोधी लढतांना स्वत:चा बचावही करायचा आहे आणि पुढेही पावले टाकायची आहेत. या संकटापेक्षाही आम्हांला आपला संकल्प मजबूत करावा लागेल. या संकटापेक्षाही तो विराट असेल. थकवा, हार, खचणे मानवाला मान्य नाही. ‘मेक इन इंडिया’ ला सशक्त करायचे आहे. स्वावलंबन, आत्मबळानेचे हे शक्य आहे. भारताने प्रत्येक स्पर्धा जिंकावी, ही काळाची मागणी आहे. घोषित आर्थिक पॅकेजने कार्यक्षमता वाढेल आणि गुणवत्ताही सुधारेल.ग्लोबल नव्हे, लोकलचा आग्रह धरामोदी म्हणाले की, आम्हाला या काळाने शिकवले आहे की, लोकलला (स्थानिक) आपला जीवनमंत्र बनवावाच लागेल. आपल्याला जे काही ग्लोबल ब्रांड लागतात, तेही कधी तरी असेच लोकल होते. जेव्हा तेथील लोकांनी त्याचा वापर सुरू केला व प्रचार केला तेव्हा ते लोकलच होते. त्यांचे ब्रांडिंग केले गेले.त्यांच्याबाबत अभिमान बाळगला गेला तेव्हा तर ते लोकलपासूल ग्लोबल झाले. त्यामुळे आज प्रत्येक भारतीयाने आपल्या लोकलसाठी व्होकल बनले पाहिजे. तुम्ही केवळ लोकल प्रॉडक्टच खरेदी करून भागणार नाही तर त्याचा अभिमानही बाळगला पाहिजे. तुमच्या प्रयत्नांनी तर तुमच्यावरील माझी श्रद्धा आणखी वाढली आहे.पंतप्रधानांनी यावेळी बोलताना स्थानिक उत्पादनांबाबत खादीचे उदाहरणही दिले. ते म्हणाले की, मी अभिमानाने एक गोष्ट अनुभवतो आणि त्याचे सदोदित स्मरणही करतो. जेव्हा मी आपल्याला, देशातील नागरिकांना खादी परिधान करण्याचा आग्रह धरला. तेव्हा हेही म्हणालो होतो की, देशाने हँडलूम कामगारांना मदत केली पाहिजे. तुम्ही पाहा. फारच कमी वेळेत खादी व हँडलूमची मागणी व विक्री रेकॉर्ड स्तरावर पोहोचली. एवढेच नव्हे तर त्यांनी आपला ब्रांडही बनवला. हा खूपच छोटा प्रयत्न होता. परंतु त्याचे परिणाम झाले. खूप चांगले परिणाम झाले....तरच आपण महामारीतून वाचूमहामारीमुळे उभ्या ठाकलेल्या संकटातून आम्हाला लोकलच वाचवले. लोकल फक्त आमची गरज नाही तर आम्हा सगळ््यांची जबाबदारीही आहे. ‘कोरोनाने आम्हाला लोकल मॅन्युफॅक्चरींग, स्थानिक पुरवठ्याची साखळी आणि स्थानिक बाजारपेठेचे महत्व समजावून सांगितले आहे. लोकलनेच आमची मागणी पूर्ण केली. आम्हाला याच लोकलने वाचवले,’ असे त्यांनी म्हटले.स्वावलंबी भारताचे पाच आधारस्तंभ...अर्थव्यवस्था, पायाभूत सोयीसुविधा, व्यवस्था, लोकसंख्या आणि मागणी (इकॉनॉमी, इन्फ्रास्ट्रक्चर, सिस्टीम, डेमॉग्राफी, डिमांड) याच पाच आधारस्तंभावर स्वावलंबी भारताची इमारत उभी राहील.च्आमच्या साधने आणि सामर्थ्य आहे. जगातील सर्वोत्कृष्ट प्रतिभावंत आहे.च्आम्ही दर्जेदार उत्पादन , गुणवत्ताही चांगली आणि पुरवठा साखळी अत्याधुनिक जरुर करु शकतो, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.
coronavirus: स्वावलंबी भारताचा निर्धार, २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 7:18 AM