नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून ती 5000 वर पोहोचली आहे. तर 150 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. तसेच डॉक्टरही आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करत आहे. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी एका केंद्रीय मंत्र्यांच्या संपूर्ण कुटुंबाने मदतीचा हात दिला आहे.
केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये जनतेला गरजूंसाठी आणि स्वत:साठी घरातच मास्क शिवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कुटुंबीयांनीही गरजूंसाठी घरातच मास्क तयार करण्याची सुरुवात केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्यांची पत्नी आणि मुलगी मशिनने मास्क शिवत असल्याचं दिसत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.
'या कठीण काळात आपण सर्वांनी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मला माझी पत्नी मृदुला आणि मुलगी नैमिषाचा अभिमान आहे. त्या आमच्या सर्वांसाठी आणि गरजूंसाठी मास्क तयार करत आहेत. आपली कौशल्ये सुधारण्यासाठी आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी यापेक्षा चांगला काळ नाही' असं ट्वीट धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या पत्नीनेही मास्क शिवले होते. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 82,156 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 14,34,825 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 3,02,468 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
कोरोनाग्रस्तांवर उपचार करता यावेत यासाठी अनेक जण काही दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून लांब आहेत. रुग्णांची सेवा करताना त्यांनी स्वत: ला झोकून दिले आहे. मध्य प्रदेशमधील एका डॉक्टरने कुटुंबाला कोरोनाचा संसर्गापासून रोखण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून आपल्या गाडीमध्येत घर केलं आहे. सचिन नायक असं या डॉक्टरचं नाव असून ते भोपाळच्या जेपी रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. पत्नी आणि मुलाला संसर्ग होऊ नये यासाठी ते गेल्या 7 दिवसांपासून गाडीतच राहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनाचे थैमान! न्यूयॉर्कमध्ये एका दिवसात तब्बल 731 जणांचा मृत्यू
Coronavirus : संपूर्ण जगासाठी 'संजीवनी' ठरणारं हे औषधं नेमकं कोण कोण तयार करतंय?
Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी ट्विटरच्या सीईओची मोठी घोषणा
Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 82,156 जणांचा मृत्यू; इटली, स्पेनमध्ये परिस्थिती गंभीर
Coronavirus : बापरे! लॉकडाऊनमध्ये दुधाच्या कॅनमधून नेत होता दारुच्या बाटल्या अन्