नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीप्रमाणे, जगात एकूण 197 देशांना मान्यता आहे. यांपैकी आतापर्यंत 186 देशांत कोरोनाने हाहाकार घारता आहे. यासंदर्भात 'वल्डोमिटर्स डॉट इंफो' हे संकेतस्थळ ताजे आकडे प्रकाशित करत आहे.
या संकेतस्थळावरील शनिवारी रात्री उशिरापर्यंतच्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसने आतापर्यंत 186 देशांना विळखा घातला आहे. यानुसार आतापर्यंत केवळ 11 देशच असे आहेत, जेथे अद्याप कोरोना पोहोचू शकलेला नाही.
या देशांत आहेत एक अथवा केवळ दोन रुग्ण - ज्या देशात इतर देशांतून येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. अशा देशांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. मात्र, असेही काही देश आहेत, की जेथे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या एक अथवा दोन एवढीच आहे. यात फिजी, गांबिया, निकारगुआ आणि कांगोसह भारता जवळील नेपाळ आणि भूतानचा समावेश होतो. नेपाळ आणि भूतानमध्ये अद्याप केवळ एकच रुग्ण आढळला आहे.
या देशांत अद्याप पोहोचू शकला नाही 'कोरोना' - जगातील जे देश अद्याप या महामारीपासून बचावलेले आहेत, त्यांपैकी अधिकांश देश अत्यंत छोटे आणि वैश्विक दृष्ट्या एकाकी आहेत. यापैकी तर अनेक देशांची नावे अशी आहेत, जी तुम्ही क्वचितच ऐकली असतील. या देशांत पलाऊ, तुवालू, वानुआतू, तिमोर-लेस्टे, सोलोमन आयलँड, सिएरा लियोनी, सामोआ, सैंट विंसेट अँड ग्रेनाडिनीज, सैंट किटिस अँड नेविससारख्या देशांचा समावेश होतो. या देशांत अद्याप कोरोना पोहोचू शकलेला नाही.
इटलीत एका दिवसांत 800 लोकांचा मृत्यू -जगभरात 2 लाख 45 हजारांहून अधिक लोक कोरोनाबाधित झाले आहेत. तर तब्बल 11 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित देशांमध्ये चीननंतरइटलीला सर्वाधिक फटका बसला असून, कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत इटली आता चीनच्या पुढे गेला आहे. इटलीत एका दिवसांत 800 लोकांचा मृत्यू झाला आहे.
इटलीमधील मुतांची संख्या आतापर्यंत 4825वर गेली आहे. जगभरात या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 38.3 टक्के आहे. इटलीची स्थिती ही चीनपेक्षा जास्त खराब आहे. इथे कोविड-19 (COVID-19)ची लागण झालेल्यांची संख्या 53578 एवढी आहे. इटलीमध्ये शुक्रवारपासून 1420 लोकांचा मृत्यू झाला आहे.
फ्रान्समध्ये ११२ जणांचा मृत्यूफ्रान्समध्ये शनिवारी कोरोना विषाणूमुळे 112 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 562वर पोहोचला आहे. या विषाणूमुळे 6172 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. रुग्णालयात 1525 लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.