CoronaVirus News: आधे इधर, आधे उधर; पंतप्रधान मोदींच्या महापॅकेजवरून काँग्रेसमध्ये 'शोले'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 10:04 AM2020-05-13T10:04:11+5:302020-05-13T10:06:16+5:30
CoronaVirus News: काही नेत्यांंकडून पॅकेजचं स्वागत; काहींकडून टीका
नवी दिल्ली: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देशाला मोठ्या आर्थिक पॅकेजची गरज असल्याचं म्हटलं जात होतं. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पॅकेजमध्ये सर्व घटकांचा विचार करण्यात आल्याचं मोदी म्हणाले. या पॅकेजमुळे भारत स्वावलंबी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजवरुन काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचं दिसून आलं आहे. देशातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीला उपस्थित असलेले काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोदींच्या पॅकेजचं स्वागत केलं. 'मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजची बरीच प्रतीक्षा होती. देर आए दुरुस्त आए. आम्ही याचं स्वागत करतो. याबद्दलचा तपशील समजल्यानंतर कोणत्या क्षेत्रांना किती लाभ मिळेल ते कळू शकेल,' असं गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
The financial package announced by PM Modi ji was much awaited. Better late than never, देर आए दुरुस्त आए. We welcome this. Now when details emerge, we would know exactly how different sectors would benefit.
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) May 12, 2020
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनीदेखील मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजचं स्वागत केलं आहे. 'मोदींनी योग्य वेळी २६६ बिलियन अमेरिकन डॉलरचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. याची योग्य अंमलबजावणी झाल्यास निर्माण झालेल्या संकटावर मात करता येईल. यामुळे जागतिक पुरवठा साखळीत भारत प्रमुख भूमिका बजावेल. याशिवाय मेक इन इंडियाची क्षमतादेखील वाढेल,' असं ट्विट देवरा यांनी केलं आहे.
Timely announcement of a US $266 billion economic package by @narendramodi ji.
— Milind Deora मिलिंद देवरा (@milinddeora) May 12, 2020
If carefully executed, we will avert a humanitarian crisis, expand India’s role in global supply chains & revolutionise our @makeinindia capabilities.
In Chinese, crisis = danger + opportunity pic.twitter.com/VEVeYuoICD
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मात्र मोदींच्या पॅकेजवरून कडाडून टीका केली आहे. 'माननीय मोदीजी, तुम्ही देशाला संबोधित करून माध्यमांना हेडलाईन तर दिलीत, पण देशाला मदतीच्या हेल्पलाईनची प्रतीक्षा आहे. आश्वासनं प्रत्यक्षात येण्याची वाट पाहायला हवी,' अशा शब्दांत सुरजेवालांनी मोदींवर टीका केली. 'घरवापसी करत असलेल्या लाखो प्रवासी मजुरांना दिलासा देण्याची, त्यांच्या जखमांना मलम लावण्याची, त्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता होती. तुम्ही याबद्दलची घोषणा कराल अशी अपेक्षा होती,' असं सुरजेवालांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
1/2
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 12, 2020
मा. मोदी जी,
आपने सम्बोधन से मीडिया को ख़बर बनाने को “हेडलाइन” तो दे दी पर देश को “मदद की हेल्पलाइन” का इंतज़ार है।
वादे से हक़ीक़त तक का सफ़र पूरा होने का इंतज़ार रहेगा।
2/2
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 12, 2020
मा. मोदी जी,
घर वापसी करते लाखों प्रवासी मज़दूर भाईयों को राहत, घाव पर मरहम, आर्थिक सहायता व सुरक्षित घर लौटने की मदद पहली ज़रूरत है।
उम्मीद थी आज आप इसकी घोषणा करेंगे।
देश राष्ट्रनिर्माता मज़दूरों व श्रमिकों के प्रति आपकी निठुरता व असवेंदनशीलता से निराश है।
काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनीदेखील मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजवर टीका केली. 'मोदींचं पॅकेज म्हणजे हेडलाईन हंटिंग आहे. त्यांनी २० लाख कोटींचा आकडा जाहीर केला. पण काहीच तपशील दिला नाही,' अशा शब्दांत तिवारींनी आर्थिक पॅकेजवरुन मोदींना लक्ष्य केलं.
-@PMOIndia ‘s speech can be summed up in one word - HEADLINE HUNTING. A NUMBER -20 LAKH CRORES. NO DETAILS.
— Manish Tewari (@ManishTewari) May 12, 2020
मोदींकडून लॉकडाऊन सुरु ठेवण्याचे संकेत; १७ मेनंतर 'असा' असेल देश?
…म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!
...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक
२० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक