नवी दिल्ली : जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूचा अनेकांनी धसका घेतला असला तरी या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या एका व्यक्तीने आपला चांगला अनुभव शेअर केला आहे. त्यातून या आजारामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, हेच स्पष्ट होते.रोहित दत्ता असे त्यांचे नाव असून, ते टेक्स्टाइल व्यावसायिक आहेत. कामानिमित्त ते इटालीला गेले होते. तसेच काही युरोपिय देशांचाही दौरा त्यांनी केला होता. ते भारतात परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले होते. तेथील अनुभव रोहित दत्ता यांनी सांगितला आहे. ते म्हणतात, तो विलगीकरण कक्ष सर्व सोयीसुविधांना सुसज्ज होता. एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या रूमप्रमाणे त्याची रचना होती. अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ती सज्ज होती. तिथे मला मोबाइल फोन वापरण्याची परवानगी होती. त्यामुळे मी माझ्या कुटुंबीयांशी व्हिडीओ कॉलने संवाद साधन होतो. त्याशिवाय नेटफ्लिक्सवर चित्रपट पाहत होता. तब्बल १४ दिवस मी तिथे होतो. पण मला आजार झाला आहे, असे तिथे जाणवलेच नाही.विलगीकरण कक्षामध्ये वाचली चाणक्य नीतीकोरोना हा आजार भयानक नाही. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, त्यांना या आजाराचा धोका आहे. अन्य एखाद्या व्हायरसमुळे आजार झाल्यास बरे होण्यास ४/५ दिवस लागतात. कोरोनाचा रुग्ण १५ दिवसांत बरा होऊ शकतो. आता मला १४ दिवस घरात राहावे लागणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विलगीकरण कक्षात असताना मी ‘चाणक्य नीती’ पुस्तक वाचून काढले, असेही रोहित दत्ता म्हणाले.डॉक्टरांचे उत्तम सहकार्यरोहित दत्ता यांना घरी पाठवण्यात आले असले तरी पुढील १४ दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.‘विलगीकरण कक्षात मी रोज प्राणायाम करीत होतो. तेथील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचे मला चांगले सहकार्य मिळाले. सुरुवातीला मी घाबरलो होतो.पण डॉक्टरांनी समजवल्यानंतर माझी भीती दूर झाली. जीव धोक्यात घालून डॉक्टर रुग्णांची काळजी घेतात. ते आमचं कर्तव्य आहे, असं डॉक्टरांनी सांगितल्याचं दत्ता म्हणाले.
coronavirus: कोरोनामुळे घाबरून जाऊ नका, हा आजार अजिबातच भयानक नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 6:43 AM