नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे केंद्राबरोबरच अनेक राज्य सरकारांची चिंता वाढली आहे. पण कोरोना संक्रमणाच्या काळातही एक चांगली बातमी समोर आली आहे. देशात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून, 3 दिवसांनी वाढून तो 10 दिवसांवर गेला आहे. तसेच गेल्या 24 तासांत देशात कोरोना संक्रमित 419 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच देशात एकूण 4,814 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचं ठीक होण्याचं प्रमाणही 20.57 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधीही वाढला असून, तीन दिवसांऐवजी आता 10 दिवसांनी देशात दुप्पट कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांद्वारे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.23 मार्चपूर्वी देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे दुप्पट होण्याचा कालावधी 3 दिवस, असा मोजला जात होता. त्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आले आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसला. 29 मार्चपासून दुपटीनं रुग्ण सापडण्याचा कालावधी वाढून पाच दिवसांवर गेला. त्यानंतर 6 एप्रिलपासून देशात कोरोना संसर्गाचा दुप्पट होण्याचा रुग्ण दर 10 दिवसांवर गेला आहे. देशात लॉकडाऊन लादले गेले नसते तर कोरोनाग्रस्तांची संख्या 73,400 हजारांवर जाण्याची भीतीसुद्धा वर्तवण्यात आली आहे.
आणखी हेसुद्धा वाचा
Coronavirus : आता बँकांना ६ महिन्यांपर्यंत करता येणार नाही संप, सरकारनं बनवला कायदा
Coronavirus : मोदी सरकार दुसरं मोठं पॅकेज देण्याच्या तयारीत; 48 तासांमध्ये होऊ शकते घोषणा
Coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वामित्व योजनेची घोषणा, गावागावांना होणार जबरदस्त फायदा