नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम केला आहे. सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे अनेक निर्बंध कायम आहेत. तर अनेक उद्योग व्यवहार अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नसल्याने देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आलेली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केंद्रातील मोदी सरकारला तीन महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.
कोरोनाचा फैलाव सुरू होण्यापूर्वीच देशातील ऑटो, टेलिकॉम आणि एनबीएफसी आदि क्षेत्रात मंदीचे वातावरण होते. आता कोरोनामुळे लोकांच्या रोजगार आणि आर्थिक क्षमतेवरही प्रभाव पडू लागलाय. अशा परिस्थितीत सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बाजारात पैसे गुंतवले आहेत, तसेच अनेक उद्योगांनाही मदत दिली आहे. मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सावरण्यासाठी सरकारने अजून मोठी पावले उचलण्याची गरज.असल्याचे डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले.
बीबीसीशी संवाद साधताना डॉ. सिंग यांनी केंद्र सरकारला तीन महत्त्वाचे सल्ले दिले. पहिली बाब म्हणजे सरकारने लोकांचा रोजगार सुरक्षित राहील याची व्यवस्था करावी, तसेच लोकांना प्रत्यक्ष आर्थिक मदत करून त्यांची खर्च करण्याची क्षमता कायम राखावी. दुसरी बाब म्हणजे सरकारने क्रेडीट हमी कार्यक्रमांतर्गत व्यापार आणि उद्योगांना पुरेशी रक्कम उपलब्ध करून द्यावी. तिसरी बाब म्हणजे सरकारने फायनान्शियल सेक्टरमध्ये संस्थागत स्वायत्तता आणि प्रक्रियांतर्गत सुधारणा केली पाहिजे.
सध्याच्या परिस्थितीला मी इकॉनॉमिक डिप्रेशन म्हणणार नाही, पण देशावर दीर्घ काळापासून एक आर्थिक संकट येणे अपेक्षित होते, असेही डॉ. मनमोहन सिंग यांनी पुढे सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक संकटात येईल, अशी भीती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत यांनी व्यक्त केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी