नवी दिल्ली - भारतात देहविक्रीवर बंदी आहे. मात्र, काही शहरांमध्ये रेड लाईट एरिया आहेत. अजमेर गेटपासून लाहौरी गेटपर्यंतच्या 1 ते 2 किमी परिसरातील जीबी रोडवरील सुरू असलेल्या देहविक्री भागास भारतातील सर्वात मोठा रेड लाईट परिसर म्हणून ओळखला जातो. 100 हून अधिक वेश्याबाजार या रोडवर चालतो. येथे रस्त्यांवरील दुकानाच्या छतावर देहव्यापर केला जातो. जीबी रोडवर जवळपास 4 हजारहून अधिक वेश्या काम करतात.
आता कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जारी केल्याने हजारो मजूर पायपीट करून आपल्या घराच्या दिशेने पलायन केले आहे. काही लोक असे ही आहेत ज्यांची राहण्याची काहीच सोय नाही. अशातच जीबी रोडवरील 2000 हून अधिक वेश्या एकाच ठिकाणी बंद आहेत. लॉकडाऊनमुळे वेश्या व्यवसाय बंद करण्यात आला आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी स्वच्छ ठिकाणी राहा आणि सोशल डिस्टनसिंग ठेवण्यास सांगितले जात आहे. मात्र, वेश्या महिलांची स्थिती याउलट पाहायला मिळत आहे. जीबी रोडवरील काम करणाऱ्या एका वेश्या महिलेने इंडिया टूडेला माहिती दिली की, आम्ही इतक्या घाणेरड्या आणि प्रकाश नसलेल्या ठिकाणी अडकलो आहोत. आमच्या समस्यांकडे अधिकाऱ्यांनी आधीपासून कानाडोळा केला आहे. आम्ही किराणा सामान आणि औषध आणण्यास देखील खाली उतरू नाही शकत. आमच्यातील बरयाच महिला आजारी आहेत. पण आम्ही डॉक्टरकडे जाऊ शकत नाही. तसेच डॉक्टरांना फोन करून बोलावू पण शकत नाही. पोलिसही आमचं ऐकत नाही आणि आमच्याकडील पैसे आता संपत आले आहेत.
गरीबीपासून बचाव करण्यासाठी येथे काम करणारे अनेक देहविक्री करणाऱ्या रेड लाईट क्षेत्रात आले आहेत. पण आता व्यवसाय ठप्प झाला आहे. आता मी स्वत: कुठेही जाऊ शकत नाही. हजारो वेश्यांसह 200 हून अधिक मुले आहेत. यापैकी जवळपास ५० मुले १ महिन्यापासून ते १ वर्ष वयोगटातील आहेत. ज्यांना पुरेसे अन्न, मास्क आणि इतर महत्वाच्या गोष्टीशिवाय जगावं लागत आहे.मंजरी (नाव बदलले आहे) ही एक वेश्या आहे. तिला आपल्या एका महिन्याच्या बाळासाठी येथे परत यावे लागले. ती झारखंडच्या बाहेरील एका छोट्याशा खेड्यातील आहे. 30 वर्षांची मंजरी 21 वर्षांची होती तेव्हा तिला वेश्याव्यापारात ढकलले गेले. तेव्हापासून ती वेश्याबाजारात राहात आहे. त्यांनी आज टाक / इंडिया टुडेला सांगितले की, कोरोना आजारामुळे आपल्यातील बरेचजण आपापल्या घरी निघून गेले होते. परंतु लॉकडाऊनमुळे आम्हाला परत यावे लागले. मंजरी म्हणतात "लॉकडाउन जाहीर होताच मालकांनी आम्हाला सोडले, आम्हाला काही व्यवस्थित सांगितले नाही. आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत. आमच्याकडे फारच कमी अन्न आहे बाकी आहे. जे आपापसात वाटून घेत आहोत. माझ्या एका महिन्याच्या बाळाला पिण्यास पुरेसे दूध नाही. काही समाजसेवक आम्हाला मदत करत आहेत. आम्ही देखील माणसं आहोत. सरकार आम्ही काळजी घेतली नाही तर आम्ही भुकेने मरू "