शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Coronavirus: कोरोनामुळे सलग ‘इतके’ दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात राहिले; ६ वर्षात दुसऱ्यांदा घडलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 12:59 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: त्यांच्या निवासस्थानातून वर्क फ्रॉम होम करत आहेत.

ठळक मुद्देमोदींनी १३ ते १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अखेर ब्राझीलचा दौरा केला होता.नोव्हेंबर २०१६ ते मे २०१७ या काळात मोदी परदेश दौर्‍यावर गेले नाहीत.कोरोनामुळे नरेंद्र मोदी ५ महिने ६ दिवस भारतात राहिले

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात संकट उभं केले आहे. बहुतांश देशांनी कोरोनापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. भारतात ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून देशातील १३० कोटी जनता घरातच क्वारंटाईन आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही विनाकारण घराबाहेर पडण्यास बंदी आहे.

या लॉकडाऊन काळात फक्त सामान्य व्यक्ती नव्हे तर अनेक व्हीव्हीआयपी लोकही कुठे येऊ-जाऊ शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: त्यांच्या निवासस्थानातून वर्क फ्रॉम होम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परदेशात जाऊन आज ५ महिने ६ दिवस झाले आहेत. गेल्या ६ वर्षात पहिल्यांदा अशी वेळ आली आहे की, इतके दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतातच राहावं लागलं आहे.

यापूर्वी मोदींनी २०१६-१७ मध्ये ६ महिने परदेश दौरा केला नव्हता. त्यावेळी नरेंद्र मोदी १२ नोव्हेंबर २०१६ रोजी जपानहून परत आले आणि त्यानंतर ११ मे २०१७ रोजी श्रीलंकेला गेले. मात्र, त्यावेळी देशात निवडणुका होत्या. मार्च २०१७ मध्ये उत्तर प्रदेशसह ५ राज्यात निवडणुकांचा काळ होता. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून जवळपास ५ वर्षे ११ महिने झाले आहेत. २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून आणि ३० मे २०१९ रोजी दुसऱ्यांदा मोदींनी शपथ घेतली. पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार मोदींनी २०१४ पासून आतापर्यंत ५९ वेळा परदेश दौरा केला आहे. यावेळी त्यांनी १०६ देशांमध्ये प्रवास केला आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून दरवर्षी दहापेक्षा जास्त परदेश दौरा करतात.

डिसेंबर २०१८ मध्ये राज्यसभेत दिलेल्या उत्तरात तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी पंतप्रधानांच्या परदेश दौर्‍यावर झालेल्या खर्चाची माहिती दिली होती. यानुसार, २०१८-१९ पर्यंत मोदींच्या परदेश प्रवासात २ हजार कोटी रुपये खर्च झाले होते. यानंतर, मोदींनी १४ परदेश दौरा केला त्यात ९० कोटी ७० लाख खर्च झाला. तथापि, या खर्चामध्ये पंतप्रधानांच्या विमानांची देखभाल आणि हॉटलाईनचा समावेश नव्हता.

पंतप्रधान मोदी नोव्हेंबर २०१६ ते मे २०१७ दरम्यान कोणत्याही परदेश दौर्‍यावर गेले नाहीत. याचे एक कारण असे होते की, त्यावेळी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होत्या. या 5 राज्यात मोदींनी नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७ दरम्यान ३८ दौरे केले. यापैकी जास्तीत जास्त २७ दौरे एकट्या उत्तर प्रदेशात झाले. याठिकाणी निवडणुकीत भाजपाने इथल्या ४०३ पैकी ३२५ जागा जिंकल्या. ५ पैकी ४ राज्यात भाजपाने सरकार स्थापन केले. फक्त पंजाबमधील सरकार गमवावे लागले होते.

आणखी वाचा...

लॉकडाऊनमुळे नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर; ट्रम्प संकटात

एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल

फेसबुक-Reliance Jioचा 'मेगा प्लॅन'; तीन कोटी दुकानदार, शेतकरी होणार मालामाल

हास्यास्पद! पाकिस्तानात ६० वर्षांचा वृद्ध 'गर्भवती'; खासगी लॅब सील करण्याची वेळ

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या