शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

CoronaVirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर किती परिणाम होणार? सर्व्हेच्या हवाल्यानं सरकारनं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 8:03 PM

आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेच्या धोक्यासंदर्भात अंदाज वर्तवले जात आहेत. सरकारचे वरिष्ठ आरोग्य सल्लागार आर. के. राघवन यांनी, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका मुलांना बसू शकतो, असा अंदाज वर्तवला होता.

नवी दिल्ली - देशात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. देशभरातील कोरोना संक्रमितांच्या आकडेवारीचा विचार करता, संक्रमितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोना संक्रमितांच्या संख्येत घट होत असली तरी, अद्यापही धोका पूर्णपणे टळलेला नाही. (CoronaVirus During third wave how much it will impact on children know what health ministry says)

आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेच्या धोक्यासंदर्भात अंदाज वर्तवले जात आहेत. सरकारचे वरिष्ठ आरोग्य सल्लागार आर. के. राघवन यांनी, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका मुलांना बसू शकतो, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, जागतिक आरोग्य संघटना आणि एम्सच्या सर्व्हेतून जे आकडे समोर आले आहेत, ते नक्कीच दिलासादायक आहेत.

मुलांवर तिसऱ्या लाटेचा कितपत परिणाम? -   नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी आरोग्य मंत्रालयाच्या नियमित पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे, की डब्ल्यूएचओ आणि एम्सच्या सीरो सर्व्हेमध्ये जे आकडे समोर आले आहेत, यावरून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर फारसा परिणाम होणार नाही, हे स्पष्ट होते.

भीषण, भयंकर, भयावह! जगभरातील कोरोना बळींची संख्या 40 लाखांवर; 166 दिवसांत 20 लाख मृत्यू

पॉल म्हणाले, या सर्व्हेदरम्यान 18 वर्षांवरील आणि त्यापेक्षा कमी वय असलेल्या लोकांच्या सर्व्हेमध्ये सीरो पॉझिटिव्हिटी रेट जवळपास सारखाच होता. 18 वर्षांवरील लोकांत सीरो पॉझिटिव्हिटी रेट 67 टक्के आणि 18 पेक्षा कमी वस असलेल्या लोकांत हा रेट 59 टक्के आहे. शहरी भागांत 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांत 78 टक्के तर 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांत हा रेट 79 टक्के असल्याचे दिसून आले आहे.

सर्व्हेत सीरो- पॉझिटिव्हिटी रेट जवळपास सारखाच -ग्रामीण भागांतील सर्व्हेदरम्यान 18 वर्षांखालील लोकांत सीरो पॉझिटिव्हिटी रेट 56 टक्के, तर 18 वर्षांवरील लोकांत 63 टक्के दिसून आला आहे. यावरून असे दिसून येते, की मुले कोरोना संक्रमित झाले, पण त्यांच्यावर फार कमी परिणाम झाला. तसेच, तिसऱ्या लाटेदरम्यान मुलांत संक्रमणाच्या काही केसेस समोर येऊ शकतात. 

CoronaVirus News: एका दगडात दोन पक्षी! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा

तसेच, आरोग्य विगाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे, की तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर मुले प्रभावित होतील, हे खरे नाही. कारण सीरो-सर्व्हे सर्व वयोगटातील लोकांसाठी सरखाच आहे. मात्र, असे असले तरी, सरकार तयारीत कुठल्याही प्रकारची कसर ठेवणार नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारdocterडॉक्टर