शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

coronavirus: "ऑगस्टपर्यंत लसीचा प्रभाव दिसून येणार, देशातील कोरोनाच्या फैलावाला असा ब्रेक लागणार’’ एम्सच्या माजी संचालकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 9:24 AM

corona Vaccination in India : कोरोनाच्या संसर्गाचा हा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारकडून लसीकरणाची मोहीम व्यापक प्रमाणात सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे देशामध्ये आतापर्यंत सुमारे सात कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे लसीचे दोन डोस खूपच कमी लोकांना देण्यात आले आहेतजुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत लोकसंख्येतील मोठ्या वर्गाला कोरोनाची लस दिली जाईल. त्यामुळे संसर्गापासून बचाव आणि त्याचा प्रभावही दिसून येईल

नवाी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Coronavirus in India) कोरोनाच्या संसर्गाचा हा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारकडून लसीकरणाची मोहीम व्यापक प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचा फैलाव वाढत असतानाच संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर एम्सचे माजी संचालक एम.सी. मिश्रा यांनी कोरोना लसीकरण (corona Vaccination) आणि कोरोनाच्या संसर्गाबाबत मोठे विधान केले आहे. ( "The effect of the Corona vaccine will be felt from August, the spread of corona in the country will come to a halt," the Former AIIMS director M. C. Mishra claimed )एम्सचे माजी संचालक डॉ. एम. सी. मिश्रा यांनी सांगितले की, हल्लीच अमेरिकेत झालेल्या संशोधनानुसार मास्कच्या वापरामुळे कोरोनाचा फैलाव झालेल्या भागात संसर्गाच्या दरात वेगाने घट होत असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत मास्क हा कोरोनाच्या लाटेला थोपवण्यासाठी प्रभावी आहे. मास्कच्या वापरामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होण्याबरोबरच मृत्युदरसुद्धा कमी होईल. त्यांनी सांगितले की, हे संशोधन जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये प्रकाशित झाले आहे. ज्या ठिकाणी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये कर्मचाऱ्यांकडून मास्कचा वापर करण्यात आला नाही. त्या ठिकाणी दर एक लाख लोकांमागे ६४३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. तसेच तिथे मृत्युदरही अधिक होता. तर जिथे मास्कचा सक्तीने वापर केला गेला तिथे एक लाख लोकांमागे केवळ ६२ रुग्णच सापडले. त्यामुळे मास्कचा वापर करण्याबाबत सक्ती आवश्यक आहे, असेही डॉ मिश्रा यांनी सांगितले.  

दरम्यान, देशात सुरू असलेले कोरोनाविरोधातील लसीकरण आणि त्याच्या प्रभावाबाबतही डॉ. एम. सी. मिश्रा यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ते म्हणाले की, देशामध्ये आतापर्यंत सुमारे सात कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. यामध्ये लसीचे दोन डोस खूपच कमी लोकांना देण्यात आले आहेत. जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत लोकसंख्येतील मोठ्या वर्गाला कोरोनाची लस दिली जाईल. त्यामुळे संसर्गापासून बचाव आणि त्याचा प्रभावही दिसून येईल. तर एम्सचे कम्युनिटी मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. संजय राय यांनी सांगितले की, देशात सद्यस्थितीत प्रत्येक १०० लोकांमधील सुमारे पाच जणांनाच कोरोनावरील लस देण्यात आली आहे. जोपर्यंत लोकसंख्येतील मोठ्या वर्गाला लस दिली जात नाही तोपर्यंत हर्ड इम्युनिटी विकसित होणार नाही.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य