नवी दिल्ली – जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 27,365 लोकांचा मृत्यू झाला असून 597,267 लोकांना संसर्ग झाला आहे. तर 133,363 लोक बरे झाले आहेत. भारतात गुरुवारी (26 मार्च) एका दिवसात तब्बल सात जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 700 हून अधिक झाली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इंजिनिअरने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक खळबळजनक पोस्ट केली आहे.
इन्फोसिस या कंपनीत काम करणाऱ्या बंगळुरूतील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने कोरोना पसरवूया अशा आशयाची एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्याने लोकांना घराबाहेर पडा आणि शिंका असं म्हटलं आहे. कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी लोकांना भडकवल्याचा आरोप पोलिसांनी केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. इन्फोसिसने याप्रकरणाची गंभीर दखल घेत त्याच्यावर कारवाई केली आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंजिनिअरने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ‘चला, बाहेर या आणि मोकळ्या जागेत शिंका आणि कोरोना पसरवा’ असं म्हटलं आहे. लोकांना कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी भडकवणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आल्याची माहिती बंगळुरूतील पोलिसांनी दिली आहे. तसेच इन्फोसिसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून इंजिनिअरला कामावरून काढून टाकत असल्याची माहिती दिली आहे. ‘इंजिनिअरने केलेली सोशल मीडिया पोस्ट इन्फोसिसच्या आचारसंहिता आणि समाजाप्रती त्याच्या बांधिलकीच्या विरोधात आहे’ असं ही कंपनीने म्हटलं आहे.
भारतात शुक्रवारी (मार्च) आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोना व्हायरसने मृत्यू झालेल्यांची संख्या 20 वर पोहोचली असून संसर्गित रुग्णांची संख्या 879 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत नवीन 75 रुग्ण आढळले. भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे. याच दरम्यान तेलंगणातील शमशाबादमध्ये एक भीषण अपघात आहे. या अपघातात5 जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. कोरोना व्हायरसमुळे काही काम नसल्याने आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
CoronaVirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८७९ वर पोहोचली, आतापर्यंत २० जणांचा मृत्यू
CoronaVirus : भारताची कोरोनापासून लवकरच मुक्तता; शास्त्रज्ञांना दिसला आशेचा किरण!
'भारतीय अर्थव्यवस्था भक्कम', पतधोरणाबाबत समितीने घेतले एकमताने निर्णय
सेवा देण्यास स्पाईसजेट तयार, मजुरांसाठी मुंबई व दिल्लीहून काही उड्डाणे करण्याची तयारी