राजकोट - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार २२ मार्च रोजी देशातील नागरिकांनी जनात कर्फ्युचं पालन केलं. त्यानंतर, दिवसभर जनता कर्फ्यूत सहभागी झालेल्या नागरिकांनी सायंकाळी ५ वाजता टाळी, थाळी, घंटा आणि शंखनाद करुन गो-कोरोना-गो अशी साद घातली. सुमारे १५ मिनीटे सुरु असलेल्या या उपक्रमानंतर नागरिक पुन्हा घरात विसावले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्माचारी, पोलीस, डॉक्टर्स, नर्स आणि इतर नागरिकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी मोदींनी देशवासियांना टाळी अन् थाळी वाजविण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनाला देशवासियांनी मोठा प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे गुजरातमध्ये एका वसाहतीत आजही दररोज सायंकाळी ५ वाजता घराबाहेर येऊन ही कृतज्ञता व्यक्त कली जात आहे.
मोदींच्या आवाहनुनसार देशभरात चहूबाजूने विस्तारलेल्या शहरात आणि ग्रामीण हद्दीतील रहिवासी वसाहतींतही ‘नाद’ करण्यात मोठा उत्साह दिसला. जवळपास १५ मिनीटांपर्यंत विविध साहित्यासह डफ आणि ढोलचा नाद केल्यानंतर नागरिकांनी देशभक्तीचा नारा देत समारोप केला होता. यावेळी त्यांनी दिलेल्या भारतमाता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी काही नागरिकांनी चक्क रस्त्यावर येऊन रॅलीच काढली, तर काहींनी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासत एकत्र जमाव केला. विशेष म्हणजे मोदींनी केलेल्या या आवाहनाला उद्या १ महिना पूर्ण होत आहे. मात्र, २२ मार्चपासून आजतागायत गुजरातच्या राजकोट येथील एका रहिवासी वसाहतीमधील सर्वच नागरिक आजही अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.
दररोज सांयकाळी ५ वाजता हे नागरिक आपल्या घरााबाहेर किंवा बाल्कीनत सोशल डिस्टन्सिंग पाळून एकत्र येतात. त्यानंतर, पुढील काही मिनिटांसाठी टाळी, थाळी आणि शंख नाद करतात. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे आता ३ मे पर्यंत हे नागरिक, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. दरम्यान, ५ एप्रिल रोजी मोदींनी घरातील लाईट्स बंद करुन ९ मिनिटांसाठी दिवे, किंवा मोबाईल टॉर्चच्या माध्यमातून कोरोनाविरुद्धच्या लढाईत देश एकत्र असल्याचा संदेश देण्याचं आवाहन केलं होतं. मोदींच्या या आवाहनालाही नागरिकांनी उंदड प्रतिसाद दिला.