नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, केंद्र सरकार त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. देशात लॉकडाऊन असल्यानं उद्योगधंदे बंद आहेत. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सूचनेनंतर 25 मेपासून देशांतर्गत हवाई प्रवासी सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. प्रवासी आणि एअरलाइन्सचे कर्मचारी यासाठी सर्व खबरदारी घेत आहेत. विमानात प्रवासी आणि एअरलाइन्सच्या कर्मचार्यांना मास्क, चेहरा झाकणारी शिल्ड आणि ग्लोव्ह्ज दिले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सामाजिक अंतर देखील ठेवले जात आहे. या बदललेल्या परिस्थितीवर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी उड्डाणादरम्यानचा एक खास फोटो ट्विटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुरक्षा उपकरणे परिधान केलेल्या फ्लाइट अटेंडंट्स आणि हातमोजे, मास्क आणि फेस शिल्ड घातलेले इंडिगो फ्लाइटमधील प्रवासी दिसत आहेत. फोटो शेअर करताना आनंद महिंद्रांनी लिहिले- "जर तुम्ही मला सहा महिन्यांपूर्वी ही चित्रे दाखविली असती तर ती एका सायन्स फिक्शन चित्रपटाच्या सेटमधून घेण्यात आली आहे, असे मला वाटले असते."
हेही वाचा
बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात, पवार फडणवीसांवर भडकले
CoronaVirus News: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का?; राणेंच्या 'त्या' विधानावर फडणवीस बोलले
"नारायण राणे अस्वस्थ, 'ती' अस्वस्थता त्यांना सत्तेपासून दूर बसू देत नाही"
CoronaVirus News : धक्कादायक! उबर इंडियानं ६०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
....म्हणून उद्धव ठाकरे अन् राज्यपालांची भेट घेतली, शरद पवारांनी सांगितलं 'कारण'
ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून भोपाळमध्ये परतणार; मध्य प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?