CoronaVirus News: काँग्रेसच्या १००० बसेसवरुन वाद; प्रियंका गांधींच्या सचिवासह प्रदेश अध्यक्षाविरोधात एफआयआर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 09:15 PM2020-05-19T21:15:05+5:302020-05-19T21:23:45+5:30
मजुरांना घरी सोडण्यावरुन उत्तर प्रदेशात राजकारण जोरात; काँग्रेस, भाजपमध्ये जुंपली
लखनऊ: देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला असताना उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि भाजपामध्ये वाकयुद्ध सुरू आहे. प्रवासी मजुरांच्या मुद्दयावरुन दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. काँग्रेसकडून मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र भाजपा सरकार त्यात आडकाठी करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
या प्रकरणावरुन राजकारण तापलं असताना आग्रा जिल्ह्याच्या सीमेवर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू उपस्थित होते. मात्र पोलिसांनी त्यांना पाय धरुन उचललं आणि ताब्यात घेतलं. यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. याशिवाय काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांचे स्विय सहाय्यक संदीप सिंह यांच्याविरोधातही एफआयआर नोंदवला गेला आहे.
अजय कुमार लल्लू यांनी पोलिसांनी ताब्यात घेताच काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींनी ट्विट केलं. 'उत्तर प्रदेश सरकारनं आता हद्दच केली. राजकीय मतभेद बाजूला सारुन अडचणीत सापडलेल्या प्रवासी मजुरांना मदत करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी आमच्यासमोर अनंत अडचणी आणल्या. योगीजी, आम्ही मजुरांसाठी पाठवत असलेल्या बसेसवर हवं तर भाजपाचे बॅनर लावा. तुमचे पोस्टर चिटकवा. पण आमची सेवा नाकारू नका. या राजकीय वादामुळे तीन दिवस वाया गेले आहेत. या तीन दिवसांत देशाच्या नागरिकांनी रस्त्यावर चालता चालता प्राण सोडले आहेत,' असं गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
उप्र सरकार ने हद कर दी है। जब राजनीतिक परहेजों को परे करते हुए त्रस्त और असहाय प्रवासी भाई बहनों को मदद करने का मौका मिला तो दुनिया भर की बाधाएँ सामने रख दिए। @myogiadityanath जी इन बसों पर आप चाहें तो भाजपा का बैनर लगा दीजिए, अपने पोस्टर बेशक लगा दीजिए लेकिन हमारे सेवा भाव..1/2 pic.twitter.com/4SW3cax2H5
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 19, 2020
या प्रकरणी प्रियंका गांधींचे स्विय सहाय्यक संदीप सिंह आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्याविरोधात लखनऊच्या हजरतगंजमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 'आम्ही गरीब मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र सरकारनं संवेदनहीनतेच्या सगळ्या सीमा ओलांडल्या आहेत. मजूर त्यांच्या घरी पोहोचावेत, असं सरकारला वाटत नाही. मात्र आम्ही आमच्या बसेसच्या माध्यमातून मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचा निश्चिय केला आहे, असं लल्लू म्हणाले.
अखेर काश्मिरी पंडितांना पुनर्वसनाची चाहूल; मोदी सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल
श्रमिक रेल्वे गाड्यांबद्दल मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; महाराष्ट्राला मोठा फायदा होणार