शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

Coronavirus: दिलासादायक! कोरोनाविरुद्ध पहिला नेजल स्प्रे भारतात दाखल; जाणून घ्या माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 3:52 PM

हा नेजल स्प्रे नायट्रिक ऑक्साईडवर आधारित आहे जे नाकाच्या वरच्या पृष्ठभागावरील कोरोना विषाणू प्रभावीपणे नष्ट करण्यासाठी कार्य करते.

नवी दिल्ली – गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीनं बहुतांश देशांची चिंता वाढवलेली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या लसीकरण हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. मात्र बुधवारी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स आणि कॅनडाई बायोटेक कंपनीनं नेजल स्प्रे बाजारात आणला आहे. कोरोनातून बरा करणारा पहिला नेजल स्प्रे बनून तयार झाला आहे.

हा स्प्रे कोविड १९ संक्रमित वयस्क लोकांच्या उपचारासाठी प्रभावी ठरणार आहे. कोरोना संक्रमण गंभीर होणाऱ्या रुग्णांसाठी हा स्प्रे आहे. भारतात डीसीजीआयनं या स्प्रेच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. फैब्रीस्प्रे नावाच्या स्प्रे ला नाकाच्या आतमध्ये कोविड १९ व्हायरस नष्ट करण्यासाठी बनवलं आहे. जेणेकरुन हा व्हायरस फुस्फुस्सापर्यंत पोहचू नये. ग्लेनमार्कला देशाच्या औषध नियामक संस्था, औषध नियंत्रक जनरल (DCGI) कडून उत्पादन आणि वितरणाची मंजुरी त्वरित मंजूरी प्रक्रियेअंतर्गत प्राप्त झाली आहे.

नाकातच व्हायरसवर हल्ला

कंपनीचा असा विश्वास आहे की, हा नेजल स्प्रे नायट्रिक ऑक्साईडवर आधारित आहे जे नाकाच्या वरच्या पृष्ठभागावरील कोरोना विषाणू प्रभावीपणे नष्ट करण्यासाठी कार्य करते. जेव्हा नाकाच्या आतील त्वचेवर हा स्प्रे मारला जातो तेव्हा नायट्रिक ऑक्साईड व्हायरसला फुफ्फुसात पोहोचण्यापासून प्रतिबंधित करते. नेजल स्प्रे हे COVID-19 साठी एक प्रभावी आणि सुरक्षित अँटीव्हायरल उपचार आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे ​​मुख्य व्यावसायिक अधिकारी रॉबर्ट क्रॉकार्ट म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की ते रुग्णांना अत्यंत आवश्यक आणि वेळेवर वैद्यकीय पर्याय प्रदान करेल.

महामारी विरुद्धच्या लढ्यात प्रभावी

चाचणी दरम्यान, स्प्रेचे सूक्ष्मजीव गुण ओळखले गेले, ज्याने हे सिद्ध केले की, जेव्हा हा स्प्रे नाकाच्या आतील त्वचेवर फवारले जाते तेव्हा ते शरीरात विषाणूची वाढ होण्यापासून प्रतिबंधित करते. कोविड महामारीविरुद्धच्या लढाईत कंपनी म्हणून आम्ही भारतासोबत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. SaNotize भारतात लॉन्च करताना आम्हाला खूप आनंद होत आहे असं ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे ​​सीईओ रॉबर्ट क्रोकार्ट म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या