नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता एअर इंडियाचे पाच पायलट कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे एअर इंडियाद्वारे सुरु असलेल्या 'वंदे भारत मिशन' या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.
एअर इंडियाचे हे पाचही पायलट मुंबईत आहेत. हे पायलट कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसोलेट करण्यात आले आहे. तसेच, एअर इंडियाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पायलट कार्गो विमान घेऊन काही दिवसांपूर्वी चीनला गेले होते.
दरम्यान, 'वंदे भारत मिशन' अंतर्गत एअर इंडियाद्वारे परदेशात अडकलेल्या अनेक भारतीयांना देशात परत आणण्यात येते आहे. याशिवाय, लॉकडाऊन दरम्यान देशातील वेगवेगळ्या भागांत अत्यावश्यक साहित्य आणि औषधे पोहोचविण्याचे काम एअर इंडियाकडून सुरु आहे.
विशेष म्हणजे, 'वंदे भारत मिशन' अंतर्गत गेल्या २४ तासांत ८०० हून अधिक परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणले आहे. परदेशांत अडकलेल्या प्रवाशांना घेऊन १२ देशांमधून विमाने देशात दाखल होत आहेत. देशातील १४ शहरांमध्ये ६४ फ्लाइटस् उतरणार आहेत. या फ्लाइट्स लहान विमानतळांवर सुद्धा उतरतील. तसेच, लोक आपापल्या घराजवळ पोहोचतील, यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे.
'वंदे भारत मिशन' यशस्वी करण्यासाठी एअर इंडिया महत्त्वाची भूमिका निभावत आहे. आखाती देशांतून २७ उड्डाणे, संयुक्त अरब अमिरातमधून ११, बांग्लादेशमधून ७, दक्षिण पूर्व आशियातून १४, अमेरिकेतून 7 उड्डाणे आणि लंडनमधून ७ उड्डाणे घेत विमाने भारतासाठी रवाना होत आहेत, अशी माहिती सांगण्यात येते.
आणखी बातम्या...
भारत-चीन सैनिकांमध्ये संघर्ष, सीमेवर काहीकाळ तणावाची परिस्थिती
CoronaVirus : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बराक ओबामा भडकले; फोन कॉल लीक
पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा भारताचा प्लॅन तयार; पाकिस्तान दहशतीखाली
CoronaVirus: कोरोनावर लस तयार करण्याच्या भारत फक्त एक पाऊल दूर; प्राण्यांवर होणार ट्रायल