भोपाळ - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 11,000 हून अधिक झाली असून आतापर्यंत 350 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भोपाळच्या वायू दुर्घटनेतून बचावलेल्या 5 जणांना कोरोनाने गाठल्याची माहिती मिळत आहे. हे पाचही जण वायू दुर्घटनेतून सुखरूपरित्या बचावले होते. पण कोरोनामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमध्ये कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. काही वर्षांपूर्वी भोपाळमध्ये भयंकर अशी वायू दुर्घटना झाली होती. हे पाचही जण यातून बचावले होते. मात्र आता कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. भोपाळ मेडिकल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जात आहेत. वायू दुर्घटनेशी निगडीत रुग्णांसाठी या रुग्णालयात खास सेवा दिली जात आहे.
भोपाळमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अशफाक नदवी हे 73 वर्षांचे होते. ते जहांगीराबाद भागाचे रहिवासी होते. याच भागात राहणारे इमरान आणि राजकुमार यादव हे दोघेदेखील कोरोनाचे बळी ठरले. तर भोपाळ वायू दुर्घटनेतील 55 वर्षीय नरेश खटीक भोपाळमधले कोरोनाचे पहिला बळी ठरले होते. 7 एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. सॅनिटायझेशनचं काम सुरू करण्यात आलं असून 50 ते 60 हजार लोकांचं स्क्रिनिंगही सुरू करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटनने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देशात आणि जगात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात दिलासादायक माहिती मिळत आहे. देशात 1000 तर जगात 4,78,932 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. भारतात आतापर्यंत 1000 हून अधिक जणांनी कोरोनाला हरवलं असून त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जगात 4,78,932 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : दिलासादायक! देशात 1000 तर जगात 4,78,932 जणांनी केली कोरोनावर मात
Coronavirus : लय भारी! 'या' देशात ATMमधून पैसे नाही तर तांदूळ काढता येणार
Coronavirus : अमेरिकेने WHO वर केला गंभीर आरोप, घेतला मोठा निर्णय