शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
5
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
6
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
7
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
8
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
9
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
10
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
11
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
12
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
13
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
14
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
15
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
16
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
17
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
18
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
19
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
20
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण

भयावह! मलयेशियावर कोरोनाचा कहर, परिस्थिती बिघडली; जमिनीवर उपचार, श्वासासाठी धडपडतायत रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 2:27 PM

"मी तीन आठवडे रुग्णालयात होतो. एक दिवस एका रुग्णाला लावण्यात आलेले मशीन सलग बीप करत होते. दोन तासांनंतर नर्स आल्या आणि त्यांनी ते मशीन बंद केले. तेव्हा कळले, की दोन तासांपूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला होता आणि मी मृतदेहाच्या शेजारी असलेल्या बेडवर होतो"

सध्या इंडोनेशिया कोरोना महामारीचे केंद्र बनले आहे. खरे तर संपूर्ण अग्नेय आशियाची स्थितीच बिघडली आहे. अनियंत्रित संक्रमणामुळे येथील मृतांचा ग्राफ वाढला आहे. इंडोनेशियात रुग्णांच्या गर्दीसमोर ऑक्सीजनचे संकट उभे ठाकले आहे. एक-एका श्वासासाठी रुग्ण धडपडत आहेत. (CoronaVirus Frightening coronavirus wreaks havoc in southeast asia death toll from infection increased)

मलेशियात रुग्णांच्या गर्दीमुळे पूर्वीपेक्षाही गंभीर स्थिती -गर्दी वाढल्याने येथील स्थिती पूर्वीपेक्षाही वाईट झाली आहे. मलेशियामध्ये जमीन आणि स्ट्रेचरवर  उपचाराची वेळ आली आहे. तसेच म्यानमारमध्येही अत्यसंस्काराच्या ठिकाणी दिवस-रात्र मृतदेह दफन करण्याचे काम सुरू आहे.

रुग्णालयात मृत्यू समोरच नाचत होता -मलेशियातील स्थितीवर बोलताना एरिक लॅम (38) म्हणाले, मी मलेशियातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या सेलांगोर शहरात राहतो. 17 जूनला कोरोना संक्रमनाची पुष्टी झाली. प्रकृती बिघडायला सुरुवात झाली, तेव्हा रुग्णालयात गेलो. तेव्हा  तेथील परिस्थिती पाहिली. मृत्यू समोर नाचू लागला, लोकांवर जमिनीवरच उपचार सुरू होते. लोक एक-एक श्वास घेण्यासाठी तडफडत होते. 

CoronaVirus: कोरोना काळात जगभरातील 15 लाख चिमुकले अनाथ, भारतातूनही समोर आला धक्कादायक आकडा

मी तीन आठवडे रुग्णालयात होतो. एक दिवस एका रुग्णाला लावण्यात आलेले मशीन सलग बीप करत होते. दोन तासांनंतर नर्स आल्या आणि त्यांनी ते मशीन बंद केले. तेव्हा कळले, की दोन तासांपूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला होता आणि मी मृतदेहाच्या शेजारी असलेल्या बेडवर होतो, हा त्या काळातील सर्वात भयावह प्रसंग होता.

इंडोनेशियात कठोर लॉकडाउनची गरज - इंडोनेशियातील संक्रमण नियंत्रणाबाहेर गेले आहे. यातच तेथील सरकारने निर्बंध शिथील करण्याची घोषणा केली आहे. मात्र, डब्ल्यूएचओने गुरुवारी इंडोनेशियात कठोर लॉकडाउनची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की इंडोनेशियात संक्रमण नियंत्रणाबाहेर गेले आहे. गेल्या पाच आठवड्यांत संक्रमणाचा वेग पाच पट वाढला आहे. रोजच्या रोज मरणारांचा आकडा 1300 वर गेला आहे. हे पाहता 34 पैकी 13 प्रांतांत कठोर लॉकडाउनची आवश्यकता आहे. 

CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! तब्बल 40 लाखांहून अधिक चिमुकल्यांना कोरोनाची लागण; रिसर्चमधून दावा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndonesiaइंडोनेशियाMalaysiaमलेशिया