coronavirus : उत्तम नाश्ता, जेवण आणि पुस्तकेही; केरळमध्ये व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 06:55 AM2020-03-18T06:55:37+5:302020-03-18T06:55:45+5:30

आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वा तशी शक्यता असल्याचे कळताच अनेक जण हबकून जात आहेत.

coronavirus : Good breakfast, meals and books too; Arrangements in Kerala | coronavirus : उत्तम नाश्ता, जेवण आणि पुस्तकेही; केरळमध्ये व्यवस्था

coronavirus : उत्तम नाश्ता, जेवण आणि पुस्तकेही; केरळमध्ये व्यवस्था

Next

कोची : आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वा तशी शक्यता असल्याचे कळताच अनेक जण हबकून जात आहेत. अनेक संशयित रुग्णांना विविध रुग्णालयांतील विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. तिथे कसे वातावरण असेल, काय व्यवस्था असेल, तिथे नीट जेवणखाण मिळेल का, नीट वागविले जाईल का, अशी भीती हा संसर्ग न झालेल्यांनाही दिसत आहे.
पण केरळ सरकारने राज्यातील १७ संशयित रुग्णांसाठी इतकी उत्तम व्यवस्था केली आहे की त्यामुळे आपण लवकरच ठणठणीत बरे होऊ , अशी खात्री तेथील सर्व रुग्णांना वाटू लागली आहे.
कोची शहरातील सरकारी रुग्णालयात या १७ सशंयीत रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी १५ जण स्थानिक असून, दोन जण ब्रिटनचे नागरिक आहेत.
केरळचे रहिवासी असलेल्या १५ जणांना रोज सकाळी नाश्त्यामध्ये डोसा, इडली, दोन अंडी, संत्री, मिनरल वॉटरची बाटली देण्यात येते. दोघा ब्रिटिश नागरिकांना आॅम्लेट, टोस्ट, ज्यूस, सूप देण्यात येते.
त्यानंतर दुपारच्या जेवणात भारतीयांना चपात्या, मासे, भाज्या, भात, डाळ, दही असते, ब्रिटिश नागरिकांना चीज टोस्ट, अननसाचा ज्यूस, विविध फळे देण्यात येतात.
पुन्हा तीन वाजता चहा, बिस्किटे, मेदुवडा, बनाना फ्राय असा नाश्ता असतो. ब्रिटिश नागरिकांना ज्यूस आणि विविध प्रकारची बिस्किटे असतात. रात्री जेवणामध्ये अप्पम, व्हेजिटेबल स्ट्यू, केळी, मिनरल वॉटर असते. परदेशी नागरिकांना टोस्टेड ब्रेड, स्क्रॅम्बल्ड एग्ज, फळे आणि मिनरल वॉटर दिले जाते. (वृत्तसंस्था)

वृत्तपत्रे, मोबाइल अन् कुटुंबियांशी गप्पा
या साऱ्या व्यवस्थेमुळे आपण आजारी आहोत, असे त्या १३ जणांना वाटत नाही. त्याशिवाय या सर्व संशयित रुग्णांना रोज मल्याळम व इंग्रजी वृत्तपत्रे वाचायला दिली जातात. त्याशिवाय त्यांना विचारून काही पुस्तकेही वाचण्यासाठी पुरवली जातात. याशिवाय या सर्वांना मोबाइल वापरायची परवानगी आहे. त्यामुळे ते आपल्या कुटुंबीयांशी, मित्रमंडळींशी गप्पा मारू शकतात आणि व्हिडीओ कॉलही करू शकतात.

Web Title: coronavirus : Good breakfast, meals and books too; Arrangements in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.